Nashik Saam
महाराष्ट्र

Nashik : आंबेडकर जयंतीच्या मिरवणुकीत अनर्थ, २३ वर्षीय तरूणाचा मृत्यू; डीजेमुळे नाका तोंडातून रक्तस्राव

Babasaheb Ambedkar Jayanti Celebration Turns Tragic in Nashik: डीजेच्या आवाजामुळे एका २३ वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.

Bhagyashree Kamble

अभिजीत सोनवणे, साम टीव्ही

डीजेच्या आवाजामुळे एका २३ वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना समोर आली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्तानं काढलेल्या मिरवणुकीत डीजे सुरू असताना हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती आहे.

डी जे सुरू असताना अचानक तरूणाच्या नाकातून आणि कानातून रक्तस्राव झाला. त्यानंतर त्याला तातडीने खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्याची प्राणज्योत मालवली. ही धक्कादायक घटना नाशिकमध्ये घडली असून, पंचवटी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

डी जेच्या आवाजामुळे तरूणाचा मृत्यू

आज डॉ. बाबासाहेब यांची जयंती. आंबेडकर जयंतीनिमित्त अनेक ठिकाणी भव्य मिरवणूक काढण्यात येते. मात्र, नाशिकमध्ये एक दुर्देवी घटना घडली. डॉ. बाबासाहेब यांच्या जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत डी जेच्या कर्कश आवाजामुळे एका तरूणाचा मृत्यू झाला. नितीन रणशिंगे (वय वर्ष २३) असे मृत तरूणाचे नाव आहे. नाशिक शहरातील पेठ रोडवरील फुलेनगर येथील तो रहिवासी होता.

नेमकं काय घडलं?

नाशकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीत तरूण देखील सहभागी झाला होता. मात्र, डी जे च्या आवाजामुळे तो जागीच कोसळला. अचानक त्याच्या नाकातून आणि कानातून रक्तस्त्राव सुरू झाला. उपस्थितांनी त्याला तातडीने नाशिक जिल्हा रूग्णलयात दाखल केले.

तरूणाला क्षयरोगाचा त्रास

वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासले असता, तरूणाला मृत घोषित केले. दरम्यान, नितीन या तरूणाला क्षयरोगाचा त्रास असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे मृत्यूचे नेमके कारण पोस्टमार्टेम अहवाल समोर आल्यानंतरच स्पष्ट होईल. तरूणाचा मृत्यू डी जेच्या मोठ्या आवाजामुळे झाला की, इतर आरोग्यविषयक कारणांमुळे झाला, हे निष्पन्न होणे बाकी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा जगातील सर्वात लोकप्रिय नेते ठरले; ७५% लोकांची पसंती|VIDEO

Shocking News : दहावीच्या विद्यार्थिनीने शाळेतच आयुष्य संपवलं, चौथ्या मजल्यावरून मारली उडी

Mumbai To Amravati: मुंबईहून अमरावतीपर्यंत प्रवास करायचा आहे? जाणून घ्या सर्वोत्तम मार्ग आणि महत्त्वाचे टिप्स

भीषण ! डीएसपी रँकच्या २ पोलीस अधिकाऱ्यांच्या अपघातात मृत्यू

Rule Change: LPG गॅस, UPI ते क्रेडिट कार्ड...; १ ऑगस्टपासून ६ नियमांत होणार मोठे बदल

SCROLL FOR NEXT