सचिन कदम
Raigad News: आज शिंदे सरकारकडून रायगडावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा ३५० वा शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. या सोहळ्यासाठी रायगड किल्ल्यावर आलेल्या शिवप्रेमी तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ओंकार भिसे असे २२ वर्षीय तरुणाचे नाव आहे. ओंकारच्या मृत्यूने त्याच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे. (Latest Marathi News)
मिळालेल्या माहितीनुसार, शिवराज्यभिषेक दिन सोहळा साजरा करण्यासाठी आलेल्या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या तरुणाला किल्ले रायगडावर पायऱ्या चढत असताना त्रास झाला. त्यामुळे त्याला रुग्णालयात नेण्यााचे ठरविले. मात्र, रुग्णालयात नेत असताना या तरुणाचा मृत्यू झाला. ओंकार भिसे असे तरुणाचे नाव असून तो २२ वर्षांचा आहे. ओंकार हा संकेश्वर, जिल्हा बेळगावामधील रहिवासी आहे.
नेमकं काय घडलं?
ओंकार हा किल्ले रायगडावर आपल्या मित्रांसोबत आला होता. गडाच्या पायऱ्या चढत असताना त्याला त्रास जाणवू लागला. त्याला प्रथम मदत केंद्र आणि नंतर पाचाड प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले असता तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. ओंकारचा मृतदेह महाड ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आला आहे. महाड तालुका पोलीस या प्रकरणी अधिक तपास करीत आहेत.
दरम्यान, आज रायगडावर हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा 350 वा राज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यानिमित्त राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हजेरी लावली. या सोहळ्याला राज्यातील सर्व शिवप्रेमींना हजेरी लावली.
या शिवप्रेमीप्रमाणे ओंकार देखील या सोहळ्यासाठी आला होता. मात्र, या सोहळ्यासाठी किल्ले रायगडाच्या पायऱ्या चढत असताना ओंकारसोबत दुर्दैवी घटना घडली. ओंकारचा नेमका मृत्यू कोणत्या कारणामुळे झाला, याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. ओंकारच्या मृत्यूने त्याच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.