Beed Crime Saam Tv
महाराष्ट्र

संतापजनक! १० वर्षीय चिमुकलीवर नराधम तरुणाकडून अत्याचार

ही घटना बीड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.

विनोद जिरे

बीड : बीड (Beed) जिल्ह्यात एका १० वर्षीय चिमुकलीवर गावातीलच एका २२ वर्षीय नराधम तरुणाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना बीड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.

पोलिसांनी (Police) दिलेली माहिती अशी, पीडित १० वर्षीय चिमुकली मुलगी बीडमध्ये नातेवाइकांकडे राहून शिक्षण घेत आहे. उन्हाळी सुट्टीत ती मुलगी गावी आली होती. ३ जून रोजी शेजारील नराधम शेख फय्युम शेख अब्दुल वय २२ या तरुणाने पीडितेला १०० रुपये देत दुकानावरून बिस्कीट आणायला सांगितले.

पीडिता बिस्कीट घेऊन आल्यावर तिला घरात नेत तिच्यावर अत्याचार केला. पीडितेने घडलेला प्रकार आईला सांगितल्यावर पीडितेची आई जाब विचारण्यास गेली, तेव्हा शेख फय्युम दुचाकीवरून पसार झाला. दरम्यान पीडित मुलीच्या आईने बीड ग्रामीण पोलीस ठाणे गाठून पोलिसांसमोर कैफियत मांडली. याप्रकरणी आरोपी नराधम शेख फय्युम याच्यावर अत्याचारासह पोक्सोनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फरार आरोपीचा पोलीस (Police) शोध घेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rava Ladoo Recipe: रोज संध्याकाळी खाण्यासाठी बनवून ठेवा स्वादिष्ट खमंग रव्याचे लाडू, वाचा सोपी रेसिपी

El Nino : अल-निनोमुळे भारतासाठी धोक्याची घंटा! २०२७ मध्ये उष्णतेचा रेकॉर्ड मोडणार, WHO कडून ग्रेड-3 अलर्ट जारी

Kangana Ranaut: कंगना रणौतच्या अडचणी वाढल्या, 'त्या' वादग्रस्त पोस्ट प्रकरणी FIR दाखल

Gold Rate Today: आठवड्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठा बदल, वाढले की घसरले? वाचा १८- २२ आणि २४ कॅरेटचे दर

Lion : जंगलाचा राजा सिंह 'या' ५ प्राण्यांना घाबरतो, समोर येताच घेतो माघार; कारण जाणून थक्क व्हाल

SCROLL FOR NEXT