Chhatrapati Sambhaji Nagar News Saam Tv
महाराष्ट्र

Chhatrapati Sambhaji Nagar News: दुर्दैवी! आंघोळीसाठी ठेवलेले गरम पाणी अंगावर पडले, 2 वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू

Girl Death After Hot Water Spills On Body: छत्रपती संभाजीनगरच्या पडेगाव परिसरात ही घटना घडली आहे.

Priya More

Chhatrapati Sambhani Nagar Police: छत्रपती संभाजीनगरमधून (Chhatrapati Sambhaji Nagar) एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. आंघोळीसाठी ठेवलेले गरम पाणी (Bath Water) अंगावर पडून चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. छत्रपती संभाजीनगर शहरातील पडेगावमध्ये ही घटना घडली. या घटनेमुळे आसपासच्या परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी छावणी पोलीस ठाण्यात (Chavani Police Station) आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगरच्या पडेगाव परिसरात ही घटना घडली आहे. याठिकाणी हारुण शेख हे आपल्या कुटुंबीयांसोबत राहतात. त्यांना तीन मुली आहेत. त्यांच्या दोन वर्षांच्या मुलीचा अंगावर गरम पाणी पडल्यामुळे मृत्यू झाला. शिद्रा हारून शेख असं या मृत चिमुकलीचे नाव आहे. आंघोळीसाठी गॅसवर पाणी गरम करण्यासाठी ठेवले होते. हेच पाणी अंगावर पडल्यामुळे शिद्राचा मृत्यू झाला आहे. शिद्राच्या मृत्यूमुळे तिच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे.

हारुण शेख हे बाहेरून घरी येत होते. त्यामुळे त्यांनी पत्नीला अंघोळीसाठी पाणी गरम करुन ठेव असे सांगितले होते. हारुण यांच्या पत्नीने गॅसवर पाणी गरम करण्यासाठी ठेवले आणि त्या बाथरुममध्ये काहीतरी काम करत होत्या. त्याचवेळी हारुण यांच्या तीन मुली गॅसजवळ खेळत होत्या. हारुण यांची छोटी मुलगी शिद्राच्या अंगावर खेळता-खेळता गरम पाणी पडले.

अंगावर गरम पाणी पडल्यामुळे शिद्रा जोरजोरात रडू लागली. तिच्या रडण्याचा आवाज ऐकून हारुण यांच्या पत्नीने तात्काळ धाव घेतली. उकळते पाणी अंगावर पडल्यामुळे शिद्रा गंभीररित्या भाजली होती. तिला तात्काळ घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. पण उपचारादरम्यान 11 जुलै रोजी तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी छावणी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video : धावती कार डिव्हायडरला धडकली अन् चार वेळा गरगरा फिरली, अपघाताचा भयंकर व्हिडिओ

Maval : मैत्रिणींसोबत खेळत असताना अनर्थ घडला; आद्रा धरणाच्या पाण्यात बुडून युवतीचा मृत्यू

Face Serum Tips: फेस सीरम लावण्याची योग्य पद्धत कोणती?

Mysterious stories from Mahabharata: शत्रू असूनही दुर्योधनाने अर्जुनाला का दिले होते ३ पराक्रमी बाण?

Nag panchami 2025: यंदा नाग पंचमी कधी आहे? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT