Trekkers Saam Tv
महाराष्ट्र

Accident: मनमाडमध्ये 120 फूट खोल दरीत कोसळून 2 ट्रेकर्सचा मृत्यू! 12 जण बचावले

शेंडीच्या डोंगरावर ट्रेकिंगसाठी (Shendi Hill Trekking) आलेल्या दोन तरुणांचा तोल जाऊन सुमारे एकशे वीस फूट खोल दरीत पडल्याने दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नाशिक: शेंडीच्या डोंगरावर ट्रेकिंगसाठी (Shendi Hill Trekking) आलेल्या दोन तरुणांचा तोल जाऊन सुमारे एकशे वीस फूट खोल दरीत पडल्याने दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तरुण डोंगरावरुन खाली पडल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर यातील एक तरुण जखमी झाला असून ट्रेकिंग करणारे इतर 12 जण सुखरूप आहेत. या घटनेनंतर नाशिक जिल्हा हादरला असून रापली, कातरवाडी, मनमाड शहरातील तरुणांनी रेस्क्यू ऑपरेशन (Rescue Operation) करत सर्वांना सुखरूप पायथ्याशी आणण्यात आले आहे.

माहितीनुसार, अहमदनगर (Ahmednagar) येथील असलेले इंद्रप्रस्थ ट्रेकर्स या ग्रुपचे एकूण 15 सदस्य मनमाड शहराजवळ असलेल्या हडबीची शेंडी, थमसप म्हणून प्रसिद्ध असलेल्या शेंडीच्या डोंगरावर ट्रेकिंगसाठी गेले होते. या ग्रुपमध्ये 8 मुली तर 7 मुले होते. या मुलांमध्ये दोन जण सराईत ट्रेकर होते.

ट्रेकिंगला आलेल्यांपैकी मयूर दत्तात्रय म्हस्के, अनिल शिवाजी वाघ या दोघांनी वर चढण्यासाठी जुन्या बोल्डिंगवर रोप लावला होता. रोपद्वारे सर्वजण शेंडीच्या डोंगरावर चढले. परंतु परतीच्या मार्गावर असताना यातील काहीजण खाली उतरले. मात्र पाठीमागे थांबलेले दोघे ट्रेकरचा बोल्डिंगमधून रोप काढत असताना अपघात झाला. वरचे बोल्डिंग दगड ठिसूळ असल्याने ते सटकले आणि यातच ट्रेकर असलेले मयूर दत्तात्रय म्हस्के, अनिल शिवाजी वाघ हे दोघे डोंगरावरून खाली पडले आहेत. यांच्यासोबत असलेला प्रशांत पवार हा तरुण देखील जखमी झाला आहे.

अपघात झाल्याचे लक्षात येताच सदर गावातील आणि मनमाड शहरातील तरुण घटनास्थळी दाखल झाले.. त्यांनी त्यांनी रेस्क्यू ऑपरेशन करत एकाला मनमाडच्या उपजिल्हा रुग्णालयात आणले. तर दुसरा व्यक्तीला रेस्क्यू करण्यात वेळ लागला. त्यानंतर रात्री मृत तरुणाला शोधण्यात आले आणि तेथून रुग्णवाहिकेतून मनमाडच्या उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India vs South Africa: वर्ल्ड चॅम्पियन्सचा नाद करायचा नाय! भारताचा द.आफ्रिकेवर मोठा विजय; ३-१ ने मालिका जिंकली

IND vs SA: पैसा वसूल मॅच! संजू - तिलकची शतकं; भारताने उभारला रेकॉर्ड ब्रेकिंग स्कोअर

Assembly Election: भुसा पाडायला आलोय, दादा भुसेंवर टीकास्त्र; शिंदे सेनेच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली !

Sanju Samson Six: खूप जोरात लागला..संजूच्या षटकारामुळे महिला फॅनला रडू कोसळलं - VIDEO

IND vs SA: संजू सॅमसनने खेचला 1500 वा षटकार! टीम इंडियाच्या नावे मोठ्या रेकॉर्डची नोंद

SCROLL FOR NEXT