रश्मी पुराणिक -
मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय असणाऱ्या प्रवीण राऊत यांना बुधवारी (2 फेब्रुवारी) अटक केली. त्यावरुन काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी भाजप सरकार आणि ईडीवर टिकास्त्र सोडलं आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणा ‘विक्रम आणि वेताळ’च्या वेताळासारख्या आहेत, अशी खोचक टीका त्यांनी केली आहे (Sachin Sawant Criticize Modi Government And National Investigation Agency After ED Arrest Pravin Raut).
सचिन सावंत काय म्हणाले?
"राष्ट्रीय तपास यंत्रणा ‘विक्रम आणि वेताळ’च्या वेताळासारख्या आहेत. फरक हाच की विक्रम बोलला तर वेताळ खांद्यावरून उडून जायचा. मोदींचा वेताळ, मोदी सरकारच्या विरोधात बोलले की बोलणाऱ्याच्या खांद्यावर बसतो. "तू बोला मैं चला" नव्हे "तू बोला मैं आया"! भाजपा नेत्यांचा खांदा याला चालत नाही".
"वर्षानुवर्षे तो वेताळ झाडाला लटके. या वेताळाचा तपासही लटकलेला राहतो. संजय राऊत जी मोदी सरकार विरोधात बोलले. भावाला लगेच अटक! 1 जाने 2021 रोजी प्रवीण राऊतांची मालमत्ता जप्त केली. मग तपास वर्षभर का लटकवला? याच HDIL ने भाजपला ₹20 कोटीची देणगी दिली त्यांच्या खांद्यावर बसणार नाही", असं ट्विट सचिन सावंत (Sachin Sawant) यांनी केलं आहे.
प्रवीण राऊत यांना अटक
शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांचे निकटवर्तीय असणाऱ्या प्रवीण राऊत (Pravin Raut) यांना ईडीने दणका दिला आहे. 1034 कोटी जमीन घोटाळा प्रकरणात ED ने HDIL शी संबंधित प्रवीण राऊतला अटक केली आहे.
प्रवीण राऊत यांना 9 फेब्रुवारी पर्यंत ईडीची कोठडी सुनावण्यात आली आहे. सेशन कोर्टानं तसा आदेश दिला आहे. प्रवीण राऊतला कोर्टात हजर केलं. अतिरिक्त सेशन जज यांच्या कोर्टात ही सुनावणी झाली. जमीन घोटाळ्याप्रकरणी प्रवीण राऊतला ईडीनं अटक केली आहे. प्रदीर्घ चौकशीनंतर बुधवारी पहाटे त्यांना अटक केली गेली.
प्रवीण राऊत हे एचडीआयएलची सहयोगी कंपनी गुरुआशिष कन्स्ट्रक्शनचे संचालक आहेत. पीएमसी बँक घोटाळ्यात प्रवीण राऊत यांचेही नाव आले होते. बँक घोटाळ्यात प्रवीणचा जबाबही ईडीनं नोंदवला होता.
Edited By - Nupur Uppal
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.