Russia Ukraine War: नाशिकमधील 2 विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले; सुटकेसाठी प्रशासनाचे प्रयत्न...(पहा Video)  Saam TV
महाराष्ट्र

Russia Ukraine War: नाशिकमधील 2 विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले; सुटकेसाठी प्रशासनाचे प्रयत्न...(पहा Video)

विद्यार्थी वसतिगृहमध्ये अडकले आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नाशिक: भारताच्या तुलनेमध्ये युक्रेन (Ukraine) येथे केवळ ३० टक्के खर्चात वैद्यकीय शिक्षण मिळत असल्याने नाशिकरोड (Nashik) भागातील आनंदनगर जगताप मळा येथील अदिती विवेक देशमुख या विद्यार्थिनीसह गंगापूररोड भागातील सावरकरनगर येथील प्रतीक प्रमोद जोंधळे असे दोघेजण यावर्षी युक्रेन मधील खारकीव मेडिकल कॉलेजमध्ये (Medical College) शिक्षणाकरिता गेले आहेत.

पहा व्हिडिओ-

वसतिगृहमध्ये अडकले आहेत. हे दोन्ही विद्यार्थी (Student) त्यांच्या कुटुंबीयांच्या संपर्कात असले तरी त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाल्यामुळे दोघांच्याही कुटुंबीयांनी स्थानिक जिल्हा प्रशासन (District Administration) आणि खासदार हेमंत गोडसे यांच्याकडे मदत मागितली आहे. यानुसार खासदार गोडसे यांनी परराष्ट्र मंत्रालयात (Ministry) विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी पाठपुरावा सुरू केला असून, जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाकडून विद्यार्थ्यांच्या सुरक्षितता आणि त्यांना परत आणण्याच्या प्रक्रियेत प्रगतीविषयी नियमित माहिती दिली जात असल्याचे २ विद्यार्थ्यांच्या नातेवाइकांनी सांगितले आहेत.

आदिती वैद्यकीय शिक्षणाकरिता प्रथम वर्षाची प्रवेशप्रक्रिया पूर्ण करून जानेवारी २०२२ मध्ये युक्रेनमध्ये गेली आहे. मात्र, रशिया (Russia) आणि युक्रेनमध्ये तणाव निर्माण झाल्याने आदितीसह महाराष्ट्र मधील सुमारे १ हजार विद्यार्थ्यांनी वसतिगृहाच्या तळघरात आश्रय घेतला आहे. सध्या ते सुरक्षित असले, तरी युद्धजन्य परिस्थितीत त्यांच्या सुरक्षेस अन्नपाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे केंद्र शासनाने विद्यार्थ्यांच्या सुटकेसाठी ठोस पावले उचलण्याची गरज आहे.

नाशिकमधून अनेक विद्यार्थी रशिया, ऑस्ट्रेलिया (Australia) आणि यूएसला शिक्षणाकरिता गेले आहेत. युक्रेनमध्ये गेलेल्या विद्यार्थ्यांची संख्या बोटावर मोजण्याइतकी असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. रशियात गेलेल्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक असण्याची शक्यता आहे. गुरुवारपर्यंत याविषयी कोणतीही माहिती जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाली नव्हती. २ पालकांव्यतिरिक्त इतर पालकांनी अद्याप संपर्क केेला नाही. यामुळे जिल्हा प्रशासनाला काहीसा दिलासा आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT