Beed News विनोद जिरे
महाराष्ट्र

धक्कादायक! 2 सख्ख्या बहिणींची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

सकाळी वडीलांनी त्यांना मैत्रिणीच्या वाढदिवसासाठी मोरेवाडीला सोडून आले होते. मात्र त्यांचा सायंकाळी विहिरीतील पाण्यात बुडलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला होता

विनोद जिरे

बीड - अंबाजोगाई (Ambajogai) शहरात अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे. एकाच कुटुंबातील 2 सख्या बहिणींनी विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली आहे. ही घटना सायंकाळी 5 ते 6 च्या दरम्यान अंबाजोगाई शहरातील स्वाराती रुग्णालयाच्या (Hospital) परिसरात घडली आहे. निदा अल्ताफ शेख वय 16 आणि सानिया अल्ताफ शेख वय 18 अशी मृत बहिणींची नावे आहेत.

हे देखील पहा -

अंबाजोगाई शहरातील स्वाराती रुग्णालयाच्या रोडवर असणाऱ्या, कंपनी बागेतील विहिरीत, काल सायंकाळी 5 ते 6 च्या दरम्यान, निदा आणि सानिया या दोन सख्ख्या बहिणींचा मृतदेह आढळून आला होता. तर त्या दोघींनी आत्महत्या केल्याचे रात्री उशीरा पोलीस तपासात समोर आले आहे. निदा आणि सानिया या अंबाजोगाई शहरातील फॉलोअर्स क्वार्टर भागात राहत होत्या.

सकाळी वडीलांनी त्यांना मैत्रिणीच्या वाढदिवसासाठी मोरेवाडीला सोडून आले होते. मात्र त्यांचा सायंकाळी विहिरीतील पाण्यात बुडलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला होता. स्थानिकांच्या मदतीने त्यांचे मृतदेह विहिरीच्या बाहेर काढून शवविच्छेदनासाठी स्वाराती रूग्णालयात पाठविण्यात आले आहे. दरम्यान, त्या दोघींनी आत्महत्या केल्याचे अंबाजोगाई शहर पोलीसांच्या तपासात रात्री स्पष्ट झाले आहे. मात्र त्यांनी आत्महत्या का केली? हे अद्याप अस्पष्ट असून अंबाजोगाई पोलीस तपास करत आहेत.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Arvind Kejriwal : आमचं सरकार आलं तर ५ दिवसांत E20 पेट्रोलवर बंदी; केजरीवाल यांची मोठी घोषणा

CJP New Team: कॉक्रोच जनता पार्टीमध्ये मोठा फेरबदल, नवीन सदस्यांची नियुक्ती, कुणाला मिळाली संधी?

Mysterious Fort : रहस्यांनी भरलेला प्राचीन किल्ला, 'या' गोष्टी तुम्हाला आश्चर्यचकित करतील

चॉकलेटचं आमिष दाखवत 3 वर्षांच्या चिमुकलीला सोबत नेलं, २० मिनिटांनी घरी आणून सोडलं... नराधमाचं संतापजनक कृत्य

जेवताना तोंडी लावण्यासाठी बनवा वांग्याचे कुरकुरीत काप; सोपी आणि चवदार रेसिपी!

SCROLL FOR NEXT