१९ नोव्हेंबर १९९६ नागपुरात दीदींचा भव्य नागरी सत्कार; गायलं होतं 'पसायदान'  Saam TV
महाराष्ट्र

19 नोव्हेंबर 1996 नागपुरात दीदींचा भव्य नागरी सत्कार; गायलं होतं 'पसायदान'

भारतरत्न लता मंगेशकर यांचा नागपूर महानगर पालिकेतर्फे नागपुरात भव्य नागरी सत्कार करण्यात आला होता.

मंगेश मोहिते

नागपूर: भारतरत्न लता मंगेशकर यांचा नागपूर महानगर पालिकेतर्फे नागपुरात भव्य नागरी सत्कार करण्यात आला होता. महानगरपालिकेच्या तत्कालीन महापौर कुंदाताई विजयकर यांच्या संकल्पनेतून लता मंगेशकर यांच्या सत्काराचा हा कार्यक्रम नागपूरच्या (Nagpur) सिव्हिल लाईन येथील विदर्भ क्रिकेट एसोसिएशनच्या मैदानावर १९ नोव्हेंबर १९९६ रोजी पार पडला होता. यावेळी नागरिकांच्या आग्रहाखातर लतादीदींनी पसायदान गायले होते अशी आठवण कुंदाताई विजयकार यांनी सांगितली.

नागपूर महानगर पालिकेतर्फे (Nagpur Muncipal Corporation) लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांचा नागरी सत्कार केल्यावर दुसऱ्या दिवशी नागपूरच्या सीताबर्डी बाजारपेठेतील एका दुकानात लता दीदी पैठणी घेण्यासाठी गेल्या होत्या. तीन पैठणी मिळून एक पैठणी त्यावेळी तयार करवून घेतल्याची आठवण कुंदाताई विजयकर यांनी सांगितली.

नागरी सत्कार झाल्यावर लता मंगेशकर यांच्याशी कुंदाताई विजयकर यांचे स्नेहबंध नेहमीसाठी जुळले. नंतरच्या काळात एकदा नागपुरात आल्यावर लतादीदी अनेकदा कुंदाताई यांचेकडे आल्या. अशाच एकदा नागपुरातील एका हॉटेल मधून घरापर्यंत कुंदाताई यांनी स्वतः कार चालवत लता मंगेशकर यांना घरी आणले होते. कारमध्ये एवढी मोठी व्यक्ती बसल्याने कार चालवताना जीवात जीव नसल्याची आठवण कुंदाताई यांनी सांगितली.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! ८-९ जुलैला राज्यातील कोणतीही शाळा बंद नाही, शिक्षण विभागाने काढले आदेश

IND vs ENG : भारताचं खातं उघडलं, इंग्लंडचं गर्वहरण, मालिकेत बरोबरी; शुभमन गिलच्या यंग ब्रिगेडनं करुन दाखवलं

Monday Horoscope : बोलण्यापेक्षा कृतींवर लक्ष द्या; 'या' राशींच्या लोकांची भरभराट होणार

मस्क यांचा नवा पक्ष 'अमेरिका पार्टी', उद्योगपती मस्कही उतरणार राजकारणात; ट्रम्प यांच्या वादानंतर मस्क यांचा मोठा निर्णय

Ind Vs Eng 2nd Test : इंग्लंडचा अभेद्य किल्ला भेदला, ५८ वर्षांनी वनवास संपवला; गिलसेनेने बर्मिंगहॅममध्ये इतिहास रचला

SCROLL FOR NEXT