Parineeti Chopra: बॉलीवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आम आदमी पार्टीचे नेते राघव चड्ढा यांच्या घरी आनंदाचे वातावरण आहे. या प्रसिद्ध कपलने त्यांच्या पहिल्या मुलाचे स्वागत केले आहे. या दोघांनीच सोशल मीडियावरून ही आनंदवार्ता चाहत्यांशी शेअर केली असून सध्या त्यांच्या या पोस्टची सर्वत्र चर्चा सुरू आहे.
परिणीती आणि राघव यांनी इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत लिहिले आहे, “तो अखेर आला आहे. आमचा छोटा मुलगा! आम्हाला खरंच आठवत नाही, त्याच्याशिवायचं आयुष्य कसं होतं. आता आमचं आयुष्य पूर्ण झालंय. आधी आम्ही दोघं होतो, आता आम्ही पूर्ण झालो आहोत.”
दोघांनीही आपल्या पोस्टमध्ये आभार व्यक्त करत म्हटलं आहे की, “हे आमच्यासाठी सर्वात खास आणि भावनिक क्षण आहेत. आम्ही प्रचंड आनंदात आहोत आणि आमच्यावर प्रेम व आशीर्वादांचा वर्षाव करणाऱ्या सर्वांचे मनापासून आभार.” चाहत्यांनी दोघांनाही नव्या प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या असून, बॉलिवूडमधील मित्रपरिवारानेही त्यांचं अभिनंदन केलं आहे.
परिणीती आणि राघव यांचा विवाह सप्टेंबर 2023 मध्ये उदयपूर येथे पारंपरिक आणि राजेशाही पद्धतीने पार पडला होता. लग्नातील त्यांचे सुंदर फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. आता त्यांच्या संसारात या चिमुकल्या पाहुण्याच्या आगमनाने त्यांचा आनंद द्विगुणित झाला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.