16 thousand 739 students from Nandurbar ready for 12th standard examination दिनू गावित
महाराष्ट्र

HSC Exam: नंदुरबारमधील 16 हजार 739 विद्यार्थी बारावीच्या परीक्षेसाठी सज्ज; प्रशासनाचीही जय्यत तयारी...

HSC Exam In Nandurbar: यंदाच्या बोर्ड परीक्षेचे विशेष म्हणजे 70 ते 100 गुण असलेल्या पेपरला अर्धा तास जास्त वेळ मिळणार आहे तसेच 40 ते 60 मार्कच्या पेपरला पंधरा मिनिटं अधिकचे मिळणार आहेत.

दिनू गावित, साम टीव्ही नंदूरबार

नंदुरबार: गेली दोन वर्ष दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षांसाठी कोरोना संसर्गजन्य रोग अडथळा ठरला होता, परंतु यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने दहावी (SSC) आणि बारावी (HSC) बोर्डाच्या परीक्षा जाहीर झाल्या आहेत. आजपासून (४ मार्च) पासून बारावी बोर्डाच्या परीक्षांना सुरुवात होत असून शिक्षण विभाग परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी सज्ज असल्याची माहिती जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण अधिकारी एम. व्ही. कदम (M. V. Kadam) यांनी दिली आहे. (16 thousand 739 students from Nandurbar ready for 12th standard examination; The administration is also well prepared ...)

हे देखील पहा -

यंदाच्या बोर्ड परीक्षेचे विशेष म्हणजे 70 ते 100 गुण असलेल्या पेपरला अर्धा तास जास्त वेळ मिळणार आहे तसेच 40 ते 60 मार्कच्या पेपरला पंधरा मिनिटं अधिकचे मिळणार आहेत. 4 मार्च पासून सुरु होणाऱ्या बारावी परीक्षांसाठी एकूण नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यात 114 परीक्षा उपकेंद्रांची निर्मिती करण्यात आली आहे. म्हणजेच शाळांवरच यंदा परीक्षेची सोय करण्यात आली आहे. २०२१-२२ वर्षासाठी 16 हजार 739 विद्यार्थी बारावी बोर्ड परीक्षेसाठी प्रविष्ट झाले आहे. तर 15 मार्चपासून सुरु होणाऱ्या दहावी बोर्डाच्या परीक्षेसाठी एकूण 376 शाळा उपकेंद्र म्हणून निर्मिती करण्यात आली. २०२१-२२ वर्षासाठी 20 हजार 703 विद्यार्थी दहावी बोर्ड परीक्षेसाठी प्रविष्ट झाले आहे.

दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षा सुरळीत पार पडावी यासाठी बोर्डातर्फे आढावा घेऊन परीक्षेसाठी आवश्यक सूचना देण्यात आलेल्या आहे. तसेच जिल्हाधिकारी मनीषा खत्री (Manisha Khatri) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत जिल्ह्यातील दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षेसाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने सर्व तयारी करण्यात आली आहे. बंदोबस्तासाठी पोलीस प्रशासनाची मदत घेतली जाणार आहे.

विशेष म्हणजे यंदाच्या दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षा विद्यार्थ्यांना आपापल्या शाळेतच देण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. गेल्या दोन वर्षांत कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षांना मुकावे लागले होते. त्यामुळे विद्यार्थ्यांमधील तणाव दूर करण्यासाठी स्वतःच्या शाळेतच कोणताही दबाव व झडती न घेता परीक्षा देण्याची सोय उपलब्ध करण्यात आली आहे. अशी माहिती नंदुरबार जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षणाधिकारी एम. वी. कदम यांनी दिली आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maheshwari Saree Designs: साध्या पण दिसायला भारी महेश्वरी साड्यांची भलतीच क्रेझ, या आहेत 5 डिझाईन्स

Two New Airlines:नव्या दोन एअरलाईन्सची विमानं आकाशात भरणार उड्डाण; केंद्र सरकारची मंजुरी

'हिंदूंनो 4 मुलं जन्माला घाला'; राणांचा सल्ला, विरोधकांचा हल्ला, VIDEO

Maharashtra Politics : भाजपला रोखण्यासाठी पवार काका-पुतण्या एकत्र? सुप्रिया सुळेंनी दिले सूचक संकेत

BMC Election : शिंदेंना हव्यात तिजोरीच्या चाव्या; BMCसाठी भाजप-शिंदेसेनेमधला पेच कायम, VIDEO

SCROLL FOR NEXT