दागिने  Saam tv
महाराष्ट्र

गोल्ड व्हॅल्युअरमुळे अर्बन बँक मातीमोल

साम टीव्ही न्यूज नेटवर्क

अहमदनगर : राज्यात बहुचर्चित नगर अर्बन बँकेच्या शेवगाव शाखेतील बनावट सोने तारणप्रकरणी गोल्ड व्हॅल्युअरसह विशाल गणेश दहिवाळकर याच्यासह १५९ कर्जदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बाबत शेवगाव शाखेचे व्यवस्थापक अनिल वासुमल आहुजा यांनी शेवगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. बनावट सोने तारण ठेवून बँकेची सुमारे पाच कोटी ३० लाख १३ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे.

आहुजा यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, सन २०१७ ते २०२१ या कालावधीत गोल्ड व्हॅल्युअर दहिवाळकर व कर्जदारांनी संगनमत करून बनावट दागिने खरे असल्याचे भासवून मूल्यांकन दाखले देऊन बँकेकडून कर्ज घेतले. कर्जदारांना वेळोवेळी नोटिसा देऊनही त्यांनी तारण ठेवलेले सोने सोडून घेतले नाही. त्यामुळे काही दिवसांपूर्वी नगर येथे बँकेच्या मुख्य शाखेत या सोन्याचा लिलाव ठेवण्यात आला होता. मात्र त्यातील सोने बनावट असल्याचे समोर आले.

मागील चार वर्षांच्या कालावधीत १५९ कर्जदारांनी ३६४ पिशव्यांत २७ किलो ३५१.१० ग्रॅम सोने बँकेकडे तारण ठेवून सुमारे पाच कोटी ३० लाख १३ हजार रुपये कर्ज घेतले होते. त्यामुळे बँकेचे गोल्ड व्हॅल्युअर दहिवाळकर याच्यासह १५९ कर्जदारांवर बँकेची आर्थिक फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.

दरम्यान, गुन्हा दाखल झाल्याने सोनेतारण कर्जदारांमध्ये खळबळ उडाली आहे. सोनेतारण व्यवहारात गोल्ड व्हॅल्युअरने मध्यस्थामार्फत काही कर्जदारांना गाठून ‘माझ्या नावे अगोदरच बँकेचे सोनेतारण कर्ज आहे. मला तातडीची आर्थिक गरज असून, सोने मी देतो फक्त तुमच्या नावे बँकेत ठेवा,’ असे सांगून फसवणूक केल्याची व्यथा अनेकांनी व्यक्त केली. या फसवणुकीत गोल्ड व्हॅल्युअरबरोबर बँकेतील इतर कोण सहभागी होते का? त्याचे मध्यस्थी करणारे दलाल कोण? यांचा ही शोध घेण्याची गरज आहे.

तर शिंदेंची आत्महत्या टळली असती

बनावट सोने तारण ठेवून कर्ज उचलले जात असल्याची तक्रार तत्कालीन व्यवस्थापक गोरक्षनाथ शिंदे यांनी २०१८ मध्ये बँक प्रशासनाकडे केली होती. मात्र बँक प्रशासनाकडून त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यांच्यावर दबाव आल्याने मागील आठवडयात विषारी औषध प्राशन करून त्यांनी आत्महत्या केली. त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात दाखवलेली तत्परता बँक व्यवस्थापनाने अगोदरच दाखवली असती, तर शिंदे यांच्यावर आत्महत्येची वेळ आली नसती, अशी खंत अनेकांनी व्यक्त केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Veg Kolhapuri Recipe: सुट्टीच्या दिवशी घरच्या घरी बनवा धाबा स्टाईल झणझणीत व्हेज कोल्हापुरी, वाचा खास रेसिपी

Bedsheet Washing Tips: उन्हाळ्याच्या दिवसात बेडवरील चादर किती दिवसात धुतली पाहिजे?

Weight Loss : वजन कमी करण्यासाठी नाश्त्यात खा नाचणीचा डोसा, चवही भन्नाट अन् आरोग्यही राहील उत्तम

Government Jobs : वन विभागात 30 हजार पदांची बंपर भरती! गणेश नाईकांची मोठी घोषणा

Maharashtra News Live Update: आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरोधात २ हजार कोटींचा मानहानी दावा

SCROLL FOR NEXT