shivbhojan thali, pandharpur news, solapur 15 centers of shivbhojan thali closed
shivbhojan thali, pandharpur news, solapur 15 centers of shivbhojan thali closed saam tv
महाराष्ट्र

Shiv Bhojan Thali Center Closed : दहा रुपयांत जेवण देणे परवडेना; शिवभोजन थाळी केंद्रांना टाळे

भारत नागणे

Shivbhojan Thali : बेघर आणि गोरगरिबांना अल्पदरात भोजन देवून त्यांची भूक भागविणाऱ्या शिव भोजन केंद्र चालकांवरच आता उपासमारीची वेळ आली आहे. गेल्या सहा महिन्यांपासून सोलापूर जिल्ह्यातील शिव भोजन केंद्राचे सुमारे साठ लाख रुपयांचे अनुदान थकले आहे. परिणामी वेळेवर अनुदान न मिळाल्याने बत्तीस पैकी तब्बल पंधरा शिवभोजन केंद्रांना कायमचे टाळे लागले आहे. (Maharashtra News)

गोरगरीब, बेघर,असंघटीत कामगार अशा लोकांना अवघ्या दहा रुपयांमध्ये जेवण मिळावे या उद्दात हेतूने तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने (mva) राज्यभरात शिवभोजन केंद्रे सुरु केली आहेत. या केंद्रांमुळे कोरोना काळात अनेकांना दिलासा मिळाला. सध्याही मजूर, बेघर, अंसघटीत कामगारांना शिवभोजन थाळीचा मोठा आधार मिळतो.

सोलापूर (solapur) जिल्ह्यातील शिवभोजन केंद्र चालकांना गेल्या सहा महिन्यांपासून अनुदान मिळाले नसल्याने केंद्र चालकांच्या आर्थिक अडचणी वाढल्या आहेत. आर्थिक अडचणींमुळे आतापर्यंत जिल्ह्यातील पंधरा शिवभोजन केंद्रांना कायमचे टाळे लागले आहेत. तर उर्वरीत केंद्रांना ही घरघर लागली आहे. शासनाची चांगली योजना सुरु राहावी यासाठी थकीत अनुदानाची रक्कम संबंधीत केंद्र चालकांना मिळावी अशी मागणी होत आहे.

साेलापूर जिल्ह्यातील बंद झालेली शिवभोजन केंद्रे

करमाळा 2

माळशिरस 1

सांगोला 2

बार्शी 3

उत्तर सोलापूर 1

माढा 2

मंगळवेढा 1

पंढरपूर 2

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Video: मतदानाआधीच बोटाला शाई? उद्धव ठाकरे यांचा भाजपवर सनसनाटी आरोप, नेमकी भानगड काय?

Today's Marathi News Live: शेगाव खामगाव परिसरात मुसळधार पाऊस

Mumbai News: २४७५ अधिकारी, २२१०० अंमलदार आणि ६२०० होमगार्ड; मतदानासाठी मुंबई पोलीस सज्ज

Sanjay Raut News: संजय राऊत यांच्यावर अहमदनगरमध्ये गुन्हा दाखल! नेमकं कारण काय?

Breaking: मोठी बातमी! आता पुणे सोलापूर मार्गावर होर्डिंग कोसळून अनेक गाड्यांचं प्रचंड मोठं नुकसान

SCROLL FOR NEXT