Sangamner
Sangamner अभिजित सोनावणे
महाराष्ट्र

बनावाट दारुसाठी वापरणाऱ्या मद्यार्काचा दीड कोटींचा साठा जप्त; राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई

अभिजित सोनावणे

संगमनेर : बनावट मद्यनिर्मितीसाठी वापरण्यात येणारा स्पिरीटचा (मद्यार्क) चा मोठा साठा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या (State Excise Department) श्रीरामपूर भरारी पथकाच्या हाती लागला आहे. संगमनेर तालुक्यातील वेल्हाळे शिवारात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या श्रीरामपूर पथकाकडून ही मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमध्ये तब्बल १ कोटी ४३ लाख ८३ हजार रूपये किंमतीचे अंदाजे १ लाख ५ हजार लिटर स्पिरीट जप्त करण्यात आले आहे. या गुन्ह्यात २ जणांना अटक करण्यात आली आहे. दोन जण फरार आहेत.

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या श्रीरामपूर (Shrirampur) विभागाच्या निरीक्षक, भरारी पथक क्रमांक २ यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, २६ एप्रिल रोजी वेल्हाळे शिवारातील हॉटेल हरीबाबा जम्मू-पंजाब चौधरी ढाब्याच्या मोकळ्या जागेत वाहतूक टँकरमधून स्पिरीट (मद्यार्क) तस्करी केली जाणार आहे. याबाबत पथकाने प्रत्यक्ष सापळा रचून तपासणी केली असता 4 व्यक्ती बेकायदेशीर रित्या स्पिरीट काढतांना आढळून आले. याठिकाणी छापा टाकण्यात आला असता शहाजहान अफसर खान (वय-३८, रा.उत्तरप्रदेश) व जुगल कुमार मंगुराम (वय-२३, रा.जम्मू काश्मीर) यांना अटक करण्यात आली आहे.

हे देखील पाहा -

महाराष्ट्र दारूबंदी कायदा (Maharashtra Prohibition Act) १९४९ चे कलम ६५ (अ) (ई), ८० (१), ८१,८३,९०,९८ (२२) अन्वये २ जणांना अटक करून व दोघांना फरार घोषित करण्यात आलं आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या या कारवाईत प्रत्येक टँकरमध्ये अंदाजे ३४ हजार ६०० लिटर स्पिरीट (मद्यार्क) असलेले तीन टँकर, २०० लिटरचे ५ बॅरल व सामग्री असे एकूण १ कोटी ४३ लाख ८३ हजार ६०० रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त कांतीलाल उमाप, अंमलबजावणी व दक्षता विभागाचे संचालक उषा वर्मा, पुणे विभागीय उपायुक्त प्रसाद सुर्वे, अहमदनगरचे अधीक्षक गणेश पाटील, उपअधीक्षक नितेश शेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कारवाई केली. फरार आरोपींचा शोध घेण्यात येत आहे. पुढील तपास निरीक्षक गोपाल चांदेकर करत आहेत. अशी माहिती निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, श्रीरामपूर यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashatra Elction: कोकणात ठाकरे विरुद्ध ठाकरे लढाई; उद्धव आणि राज ठाकरेंच्या सभांचा झंजावात

Petrol वर नाही CNG वर धावणार Bajaj ची नविन बाईक, Platina पेक्षा देणार जास्त मायलेज

Poco X6 5G नविन अवतारात लॉन्च झाला, मिळणार जबरदस्त फीचर्स

Farmers Protest: पंजाबमध्ये शेतकऱ्यांचे रेल रोको आंदोलन, 3 दिवस 46 गाड्या रद्द; 100 मार्ग बदलले

Gadchiroli Crime: धक्कादायक! जादूटोणाच्या संशयातून गावकऱ्यांनी महिलेसह दोघांना जिवंत जाळलं

SCROLL FOR NEXT