Sambhaji nagar Saam Tv News
महाराष्ट्र

Crime: भयंकर! वडील वारले, आईनं सोडलं, पैशांसाठी आजी - आजोबांनी विकलं; लैंगिक त्रासाला..

Chhatrapati Sambhaji Nagar News: २ लाख रूपयांसाठी आजी आजोबांनी १४ वर्षीय मुलीचं लग्न लावून दिलं. २ महिने पतीच्या लैंगिक त्रासाला कंटाळून तिनं पोलीस ठाण्यात धाव घेतली.

Bhagyashree Kamble

पैशांसाठी एका आजी आजोबांनी आपल्या नातीला विकल्याचा प्रकार घडला आहे. ही संतापजनक घटना छत्रपती संभाजीनगरमधील शेवगावमध्ये घडली आहे. २ लाख रूपयांसाठी आजी आजोबांनी १४ वर्षीय मुलीचं लग्न लावून दिलं. २ महिने पतीच्या लैंगिक त्रासाला कंटाळून तिनं पोलीस ठाण्यात धाव घेतली. यानंतर हे प्रकरण समोर आलं.

छत्रपती संभाजीनगरमधील शेवगावमध्ये अत्यंत संतापजनक घटना घडली आहे. पैशांसाठी आजी आजोबांनी १४ वर्षीय मुलीचं लग्न लावून दिलं. दहा वर्षांची असतानाच वडील वारले होते. आई विचार न करता लेकीला सोडून गेली. ती मुलगी आजी-आजोबा आणि काकांकडे राहत होती. मुलगी नववीत शिकत असल्याची माहिती आहे.

नंतर आजी - आजोबा आणि काकांना ती नकोशी झाली होती. आजी-आजोबांनी एका कुटुंबाकडून दोन लाख रुपये घेऊन तिचे लग्न लावून दिले होती. नतंर ती सासरी नांदायला गेली. पतीच्या लैंगिक त्रासात तिने २ महिने काढले. मात्र, हा त्रास वाढत गेल्यामुळे तिनं थेट पोलीस ठाणे गाठले आणि पोलिसांना आपबिती सांगितली.

ही घटना मंगळवारी उघड झाली. मुलीनं पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीनुसार, आजी-आजोबांनी तिच्या सासरच्यांकडून तिच्यादेखत दोन लाख रुपये घेतले होते. १ जानेवारीला गावातील एका २५ वर्षीय युवकासोबत लग्न लावून देण्यात आले होते. त्रास असह्य झाल्यामुळं ४ मार्चला मुलीनं पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. या प्रकरणी पोलीस तपास करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: दुष्काळ घोषणेवर मुनगंटीवारांची प्रतिक्रिया; चंद्रपूरमधील सुटलेल्या तालुक्यांसाठी मुख्यमंत्र्यांकडे मागणी

खासदार-आमदारांची पळवापळवी! २०२२ पासून १११ नेत्यांनी बदलला पक्ष, भाजप दुसऱ्या क्रमांकावर; आकडेवारी पाहून चक्रावून जाल

Good News: पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज! ऑक्टोबरमध्ये मिळणार ५ महिन्यांच्या पेन्शनची थकबाकी; एकाचवेळी किती पैसे मिळणार?

Dal Makhani Recipe: हॉटेलमध्ये खाण्याची गरज नाही! अशी बनवा घरच्या घरी रेस्टॉरंटसारखी दाल माखनी

Cheese Ball Recipe: लहान मुलांसाठी झटपट बनवा कुरकुरीत आणि चीजने भरलेले चीज बॉल्स, वाचा रेसिपी

SCROLL FOR NEXT