Bhadrakali Police Station Saam TV
महाराष्ट्र

Nashik News : नाशिकमध्ये १४ वर्षीय मुलीचा टबमध्ये बुडून मृत्यू, पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये समोर आलेल्या माहितीने सर्वांनाच धक्का बसला

Nashik Crime News : मुलीच्या मृत्यूप्रकरणी पोलिसांना अज्ञात व्यक्तीविरोधात पोक्सो कायद्यान्वये बलात्काराचा गुन्हा दाखल केला असूनन पुढीत तपास सुरु आहे.

साम टिव्ही ब्युरो

तबरेज शेख

Nashik News :

नाशिकमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. एका १४ वर्षीय मुलीचा पाण्याच्या टबात बुडून मृत्यू झाला आहे. मुलीला चक्कर आल्याने ती पाण्याच्या टबात कोसळल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. मात्र शवविच्छेदन अहवालात मुलगी गर्भवती असल्याची माहिती समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या आधारे पोलिसांनी या प्रकरणी एका आरोपीविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.

मृत मुलीची आई नाशिकमधील भद्रकाली परिसरात एका सोसायटीमध्ये धुणीभांडी करण्याचं काम करते. मुलीचे वडील आजारी असल्याने आई काम करण्यासाठी जाऊ शकत नव्हती. मात्र कामाला खाडा होऊ नये म्हणून मुलीच्या आईने तिला धुणीभांडी करण्यासाठी पाठवलं. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आई-वडिलांच्या परवानगीने पीडित मुलगी शनिवारी सकाळी सोसायटीत काम करण्यास गेली. बाथरुममध्ये कपडे धुवत असतानाच तिला अचानक चक्कर आली. यानंतर ती पाटावरुन कोसळून समोरील छोट्या टबात पडली, त्यात तिचं तोंड बुडालं.  (Crime News)

यावेळी घरात उपस्थित दाम्पत्याने काही वेळातच मुलीला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी मुलीला तपासून मृत घोषित केले आणि घटनेची माहिती भद्रकाली पोलिसांना कळवली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन घटनेबाबत माहिती घेऊन तपास सुरू केला.

पोलिसांनी प्रथम मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. शवविच्छेदन अहवालात धक्कादायक माहिती समोर आली. मुलगी पाच महिन्यांची गर्भवती असल्याची माहिती समोर आली. या प्रकरणी पोलिसांना अज्ञात व्यक्तीविरोधात पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल केला असून पुढीत तपास सुरु आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: चाळीतील महिलांची सर्वत्र चर्चा! दिलात झापुक झूपूक गाण्यावर केला जबरदस्त डान्स; VIDEO एकदा पाहाच

Apaar ID: प्रत्येक विद्यार्थ्याला मिळणार अपार कार्ड, १२ अंकी युनिक नंबर, उपयोग काय?

Maharashtra Politics : मला मविआने खलनायक ठरवलं, मराठा समाज हिंदुत्वाच्या बाजूने - देवेंद्र फडणवीस

Maharashtra Election : अबब! राज्यात पैशांचा महापूर, आचारसंहितामध्ये आतापर्यंत ५३६ कोटींची मालमत्ता जप्त!

Marathi Actress: फोटोतील या चिमुकलीला ओळखलंत का? आहे मराठी मालिकेतील लोकप्रिय अभिनेत्री

SCROLL FOR NEXT