Navi Mumbai Municipal Corporation Saam Tv
महाराष्ट्र

कल्याण : 'त्या' १४ गावांचा नवी मुंबई महापालिकेत समावेश होणार, Saam TV च्या बातमीची दखल

मनसे आमदार राजू पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र दिले होते.

प्रदीप भणगे

डोंबिवली : कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील १४ गावांचा नवी मुंबई महापालिकेत समावेश करण्याची मागणी मागील काही वर्षांपासून येथील नागरिक करत होते. ही गावे महापालिकेत समाविष्ट करण्यासाठी मनसेचे आमदार राजू पाटील (Raju Patil) आणि १४ गाव सर्व पक्षीय विकास समिती यांनी पाठपुरावा केला होता. याबाबत साम टीव्हीने बातमी (Saam Tv News) प्रसिद्ध केली होती. त्यानंतर आमदार पाटील यांनी हा विषय अर्थसंकल्पीय अधिवेशनातही मांडला होता. परंतु, त्यावेळी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) पालकमंत्री असताना ही गावे नवी मुंबई महापालिकेत समाविष्ट करण्याची घोषणा केली होती. पंरतु, घोषणा होऊनही हा विषय अडकूनच राहिला होता. मात्र, आता शासनाने जीआर काढल्याने या १४ गावांचा नवी मुंबई महापालिकेत समावेश करण्यात येणार आहे.

मनसे आमदार राजू पाटील यांनी २० ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र दिले आणि अर्थसंकल्पीय अधिवेशनात लक्षवेधीला दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करा अशी मागणी केली. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी पतातडीने दखल घेतली आणि याबाबतचा जीआर काढला.

'या' गावांचा होणार नवी मुंबई महावपालिकेत समावेश

१) दहिसर

२) मोकाशी

३) वालिवली

४) पिंपरी

५) निघू

६) नावाळी

७) वाकलण

८) बामार्ली

९) नारीवली

१०) बाळे

११) नागाव

१२) भंडार्ली

१३) उत्तरशीव

१४) गोटेघर

Edited By - Naresh Shende

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: राज्यात उष्णतेचा कहर, विदर्भात तापमान ४५ पेक्षा जास्त

IPL 2026 मधील सर्वात जबरदस्त सामना; अवघ्या ३९ चेंडूंत RCBने मिळवला विजय,पॉईंट्स टेबल बेंगरुळुची भरारी

Vande Bharat Train Accident : मुंबईहून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा अपघात कसा घडला? कारण आलं समोर

Gold and Silver Prices: चांदी चकाकली! चांदीच्या दरात ३,५०० रुपयांची वाढ, सोनंही महागलं

LPG Cylinder Booking Rules: १ मे पासून एलपीजी बुकिंगचे नियम बदलणार, सिलिंडर डिलीव्हरीतही बदल होणार?

SCROLL FOR NEXT