विरोधकांनी आरक्षणासारख्या संवेदनशील विषयावर दुटप्पी भूमिका घेतली- फडणवीस SaamTv
महाराष्ट्र

विरोधकांनी आरक्षणासारख्या संवेदनशील विषयावर दुटप्पी भूमिका घेतली- फडणवीस

127 वे दुरूस्ती विधेयक संसदेने आज पारित केल्याबद्दल मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि संसदेतील सदस्यांचे खूप खूप आभार अशा शब्दांमध्ये विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारचे आभार मानले.

रामनाथ दवणे साम टीव्ही मुंबई

102 व्या घटनादुरूस्तीसंदर्भात, मा. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे निर्माण झालेल्या स्थितीवर आपली भूमिका स्पष्ट करणारे 127 वे दुरूस्ती विधेयक संसदेने आज पारित केल्याबद्दल मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि संसदेतील सदस्यांचे खूप खूप आभार अशा शब्दांमध्ये विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मोदींचे आणि केंद्र सरकारचे आभार मानले आहेत. तसेच विरोधकांनी आरक्षणासारख्या संवेदनशील विषयावर दुटप्पी भूमिका घेतली, याचा मला खेद वाटतो असही फडणवीसांनी वक्तव्य केलं आहे Regarding the 127th Amendment Bill passed by the Parliament today Thanks to PM Narendra Modi

शिवाय एखाद्या घटकाला मागास ठरविण्याचा अधिकार हा राज्यांचाच होता आणि तो यापुढे सुद्धा राज्यांनाच असला पाहिजे, अशी ठाम भूमिका केंद्र सरकारची नेहमीच होती. 102व्या घटनादुरूस्तीच्यावेळी संसदेत सुद्धा हीच भूमिका केंद्र सरकारने वारंवार स्पष्ट केली होती

मात्र मा. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे काहीसे संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. आज पुन्हा एकदा केंद्र सरकारने आपली भूमिका स्पष्ट केली आणि राज्यांतील मागास घटक हे राज्यांना, तर केंद्राच्या यादीतील मागास केंद्राला ठरविण्याचा अधिकार अधिक सुस्पष्ट केला असून आता या निर्णयामुळे देशभरातील मागास घटकांना मोठा दिलासा मिळणार आहे. याशिवाय, महाराष्ट्रातील मराठा आरक्षण आणि ओबीसींचे राजकीय आरक्षण पुनर्स्थापित करण्याच्या प्रक्रियेला सुद्धा कायदेशीर बळ मिळणार आहे. असल्याचा विश्वासही फडणवीसांनी व्यक्त केला आहे.

मात्र विरोधकांनी आरक्षणासारख्या संवेदनशील विषयावर दुटप्पी भूमिका घेतली, याचा मला खेद वाटतो आधी केंद्राने राज्यांचे अधिकार काढून घेतल्याची टीका केली, तर आता पुन्हा हा विषय केंद्र सरकारकडे कसा ढकलता येईल, याचा प्रयत्न चालविला जातोय. पण, राजकारणाने आरक्षणाचे प्रश्न सुटणार नाहीत. अशी टीकाही त्यांनी राज्यातील महाविकास आघआडी सरकारवरती केली आहे.

Edited By-Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT