...तर महाराष्ट्रात पुन्हा लॅाकडाऊन लागणार; राजेश टोपेंची माहिती

कोरोना महामारी (Corona virus) पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Udhav Thackeray) यांच्या उपस्थितीत राज्य मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक पार पडली.
...तर महाराष्ट्रात पुन्हा लॅाकडाऊन लागणार; राजेश टोपेंची माहिती
...तर महाराष्ट्रात पुन्हा लॅाकडाऊन लागणार; राजेश टोपेंची माहिती Saam Tv
Published On

कोरोना महामारी (Corona virus) पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Udhav Thackeray) यांच्या उपस्थितीत राज्य मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक पार पडली. सह्याद्री अतिथीगृहावर ही बैठक झाली. कोरोना निर्बंधांबाबत आणखी शिथिलता देण्यात आली आहे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी याबाबतची माहिती दिली आहे. १५ ऑगस्ट पासून राज्यातील निर्बंध कमी करण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी नुकत्याच आयोजित पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली आहे. अनलॅाकचा निर्णय घेत असताना राजेश टोपे यांनी तिसऱ्या लाटेच्या हिशोबाने एक महत्त्वाची माहिती दिली आहे. ज्या दिवशी महाराष्ट्रात तिसऱ्या लाटेच्या दरम्यान 700 मेट्रिक टन ऑक्सिजन लागेल त्या दिवशी महाराष्ट्रात पुन्हा लॅाकडाऊन लागणार असल्याचे राजेश टोपे यांनी सांगितले आहे.

...तर महाराष्ट्रात पुन्हा लॅाकडाऊन लागणार; राजेश टोपेंची माहिती
मिरज-पंढरपूर रस्त्यावर रोडरॉबरी!; मारहाण करत लुटले 3 लाख रुपये

शिथिल झालेले निर्णय पुढीलप्रमाणे

- लसीचे दोन्ही डोस घेऊन १४ दिवस पुर्ण झाले असतील तरच लोकलने प्रवासाची मुभा मिळणार.

- नियम तोडून प्रवास केला 500 रुपये दंड आणि कारवाई होऊ शकते

- हॉटेल्स ,रेस्टॉरंट 50 टक्के क्षमतेने सुरू होणार

- लग्नाला खुल्या लॉनमध्ये 200 लोकांना परवानगी

- खासगी कार्यालय 24 तास खुले राहू शकतील

- एकाच वेळी सगळा स्टाफ येण्यापेक्षा एक शिफ्ट मध्ये 25% क्षमतेने कर्मचारी येऊ शकतील

- सगळी दुकान 10 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी

- सिनेमा मल्टिप्लेक्स,नाट्यगृहांना सूट नाही

- पुढील आदेश येईपर्यंत धार्मिक स्थळ बंदच राहणार

- Indoor sports खेळाडू आणि कर्मचारी लसी दोन डोस झाले असतील त्याला मान्यता

- तिसरी लाट महाराष्ट्रात ऑक्सिजन 1300 मेट्रिक टन आहे.

- औद्योगिक क्षेत्राने 200-300 मॅट्रिक टन वाढवणार आहेत.

- PSA plants 141 प्रत्यक्षात ऑक्सिजन निर्मिती कामाला सुरुवात

- 1700 ते 2000 पर्यंत ऑक्सिजन उपलब्ध होईल

- तिसऱ्या लाटेसाठी दुसऱ्या लाटेच्यापेक्षा दीड पट तयारी केली आहे.

- शाळा सुरू होण्याबाबत आज टास्क फोर्स मुख्यमंत्री शालेय शिक्षण विभाग बैठक होणार मग निर्णय होणार.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com