pandharpur, Ashadhi Ekadashi, CCTV Camera saam tv
महाराष्ट्र

Ashadhi Ekadashi : 120 सीसीटीव्ही कॅमेरेतून पंढरपूरवर ठेवली जातेय नजर, आषाढीसाठी पाेलिस दल सज्ज

Warkari Sampraday : राज्यभरातील वारकरी पंढरीत पाेहचू लागले आहेत.

भारत नागणे

Ashadhi Ekadashi 2023 : आषाढी यात्रा सोहळ्याची पंढरपुरात (Pandharpur) लगबग सुरू झाली आहे. आत्तापासूनच भाविकांची पंढरीत माेठी गर्दी हाेऊ लागली आहे. वारीसाठी आलेल्या भाविकांच्या सुरक्षेसाठी पोलिसांकडून शहरात 120 सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. (Maharashtra News)

यंदा आषाढी एकादशी दिवशी भाविकांची लाखाेंच्या संख्येने पंढरीत गर्दी हाेण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदा प्रथमच माेठ्या संख्येेने सीसीटीव्ही कॅमेरे शहरात उभारण्यात आले आहेत. या सीसीटीव्ही कॅमेरावरुन गर्दीवर नियंत्रण ठेवणे, गर्दीच्या ठिकाणी पाेलिसांशी संपर्क साधणे असे कंट्राेल रुममधून केले जाणार आहे.

अरुण फुगे (पोलीस निरीक्षक, पंढरपूर) म्हणाले पंढरपूर शहर पोलीस ठाण्यातून याचे नियंत्रण केले जात आहे. चंद्रभागा वाळवंट, नगर प्रदक्षिणा , मंदिर परिसर ,शहरातील मुख्य रस्ते ,चौक अशा सर्वच ठिकाणी हे सीसीटीव्ही कॅमेरे तीर्थक्षेत्र विकास आराखड्या अंतर्गत पाच कोटी रुपये खर्चून लावण्यात आले आहेत.

त्यामुळे पंढरीत पाेलिसांची आता आणखी करडी नजर राहणार आहे. दरम्यान कुठेही गर्दीत भाविकांच्या जीवितास धोका होऊ नये, अनुचित प्रकार घडू नये यासाठी यंदाच्या वारीत प्रथमच इतक्या मोठ्या संख्येने कॅमेऱ्याची नजर संपूर्ण वारीवर आणि भाविकांच्या गर्दीवर असणार आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Aadhaar Verification : आधार कार्ड खरे की खोटे? फसवणुकीपासून सावध राहण्यासाठी आवश्यक टिप्स

Pune Ganpati Visarjan: पुण्यातील मानाच्या पाचही गणपतींचे भव्य विसर्जन संपन्न|VIDEO

Maharashtra Live News Update: शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला राज ठाकरे शिवतीर्थावर जाणार

Breaking News : ऐन गणेशोत्सवात मोठी दुर्घटना; रोपवे तुटल्याने ६ जणांचा मृत्यू

OBC/ Maratha Reservation: मुख्यमंत्री फडणवीसांसमोर आखणी एक आव्हान; उपराजधानीत निघणार भव्य मोर्चा

SCROLL FOR NEXT