अकोल्यातील विद्यार्थ्याची आत्महत्या: PSI व पोलिस कर्मचाऱ्यांवर कुटुंबीयांचा आरोप Saam Tv
महाराष्ट्र

Akola News: बारावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या; वर्गमित्रासह पोलीस अधिकाऱ्याच्या त्रासामुळं टोकाचं पाऊल उचलल्याचा आरोप

Akola: अकोल्यातील बारावीच्या विद्यार्थ्याने आत्महत्या केली आहे. वर्गमित्रासह पोलीस उपनिरीक्षक आणि पोलीस कर्मचाऱ्याच्या जाचाला कंटाळून त्याने मृत्यूला कवटाळल्याचा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अकोल्यातील प्रसन्न वानखडे या बारावीतील विद्यार्थ्याने आत्महत्या केली आहे. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, त्याच्या वर्गमित्रासह संबंधित पोलीस उपनिरीक्षक (PSI) आणि एका पोलीस कर्मचाऱ्याच्या जाचामुळे प्रसन्नने नैराश्यातून हे टोकाचे पाऊल उचलल्याचं सांगण्यात येत आहे.

अकोला शहरातील आकाशवाणी केंद्रामागील जलाराम सोसायटीमध्ये ही घटना घडली. बुलढाण्यातील मेहकर येथील रहिवासी असलेल्या एका विद्यार्थ्याने आत्महत्या केली आहे. मागील महिन्यात या विद्यार्थ्याचा आणि अन्य एका विद्यार्थ्याचा वाद झाला होता. या वादानंतर प्रसन्नविरोधात सिव्हिल लाइन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

कुटुंबीयांनी केलेल्या आरोपानुसार, या प्रकरणातून सुटका करण्यासाठी संबंधित पोलीस कर्मचाऱ्यानं विद्यार्थ्याकडे एक लाख रुपयांची मागणी केली होती. कुटुंबीयांनी सिव्हिल लाइन पोलिसांवर एक लाख रुपयांची मागणी केल्याचा गंभीर आरोप केला आहे.

या घटनेचा पोलिसांनी तपास सुरू केला आहे. प्रसन्नच्या आत्महत्येस कुणी जबाबदार आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचे आश्वासन नातेवाईकांना दिले आहे.

Edited By - Purva Palande

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बिहारमध्ये मोठी दुर्घटना! गंगा नदीत २० जणांना घेऊन जाणारी बोट उलटली; ११ जणांचा मृत्यू

महायुतीत समन्वयाचा 'दुष्काळ', उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा नाराज?

Fact Check: ऑनलाईन शॉपिंग महागणार? ऑनलाईन शॉपिंगवर 5% GST?

नवी मुंबई महापालिकेत मतदार राहतात, वॉर्ड ऑफिसच्या पत्त्यावर 27 मतदारांची नोंद

IMD Alert: महाराष्ट्रासह 17 राज्यात धो-धो बरसणार वरूणराजा; 60 ताशी वेगाने वाहणार सोसाट्याचा वारा

SCROLL FOR NEXT