Akola : अकोल्यात तीन वाहनांचा विचित्र अपघात, एकाचा जागीच मत्यू,६ गंभीर जखमी

Akola Accident : अकोल्यात आपातापा रोडवर दुर्दैवी अपघात झालाय. तीन वाहने एकमेकांना धडकल्यामुळे भीषण अपघात झाला, यामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला. तर सहा जण जखमी आहेत.
Akola Accident
Akola Accident
Published On

अक्षय गवळी, अकोला प्रतिनिधी

Akola Accident News : अकोल्याच्या आपातापा रोडवर तीन वाहनांचा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत एकाचा जागीच मृत्यू झाला, तर सहा जण गंभीर जखमी आहेत. अपघातानंतर घटनास्थळी मोठी गर्दी झाली असून, स्थानिक नागरिकांनी मदत करत जखमींना सरकारी रुग्णालयात हलविले. तर बोरगाव पोलीस घटनास्थळी दाखल न झाल्याने नातेवाईकांनी रोष व्यक्त केला

अकोला जिल्ह्यातील आपातापा रोडवर शुक्रवारी सायंकाळी सातच्या सुमारास भीषण अपघात झाला. या अपघातात तीन वाहने परस्परांना धडकल्याने मोठी दुर्घटना घडली. यामध्ये एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला, तर सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातस्थळी विद्युत मंडळाच्या खांब बसवण्याचे काम सुरू होते. याच दरम्यान, अकोल्याहून आपातापाकडे जाणारी बोलेरो, रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीला धडकली. त्याचवेळी, अकोल्याहून म्हैसागडे जाणारी स्विफ्ट डिझायर देखील या गोंधळात सापडून अपघातग्रस्त झाली. या भीषण अपघातात आपातापा येथील शंकर रामदास बापटे यांचा जागीच मृत्यू झाला, तर स्विफ्ट डिझायरच्या चालकासह सहा जण गंभीर जखमी झाले आहेत.

Akola Accident
Pune : बायको-पोरावर चाकूने सपासप वार, मुलाचा खून करणाऱ्या जन्मदात्या बापाला जन्मठेप

घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मदतकार्य सुरू करत मृतकास सर्व विच्छेदनासाठी तसेच जखमींना अकोला सर्वोपचार रुग्णालयात हलविण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. अपघातानंतर घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून, त्यांनी वाहतूक सुरळीत करण्यास सुरुवात केली आहे. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या मार्गावर वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

Akola Accident
Crime News : अकोला हादरलं, शिक्षकाने शाळेतच ६ मुलींचा केला विनयभंग, अश्लील व्हिडिओ दाखवत छळ!

स्थानिक प्रशासनाने योग्य सुरक्षा उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे. रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या अनधिकृत अडथळ्यांमुळे वाहनचालकांचा अंदाज चुकतो, परिणामी अशा दुर्घटना घडतात. पोलीस प्रशासनाने वाहनचालकांना वेगमर्यादा पाळण्याचे आणि सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. तसेच, या अपघाताचा सखोल तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com