Wardha accident update saam tv
महाराष्ट्र

Wardha Accident : देवळी मार्गावर कारची टेम्पोला जोरदार धडक, भीषण अपघातात १२ जण जखमी

वर्धा येथील देवळी मार्गावर भीषण अपघात झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे.

साम टिव्ही ब्युरो

चेतन व्यास

वर्धा : येथील देवळी मार्गावर भीषण अपघात झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. मजूरांना घेवून जाणाऱ्या एका वाहनाला भरधाव वेगानं जाणाऱ्या कारने धडक दिल्याने हा भीषण अपघात झाला. या अपघातात (Accident) मालवाहू वाहनातील चालकासह १० महिला जखमी झाल्या आहेत. तर कारमधील दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी जखमींना सावंगी रुग्णालयात दाखल केले. (12 people injured in tempo and car accident at wardha devali road)

मिळालेल्या माहितीनुसार,सालोड हिरापूर येथील विजय दाते शेतीच्या कामासाठी निघाले होते. त्यांच्यासोबत पत्नी मुलासह दहा जण प्रवास करत होते. देवळी महामार्गावर जयस्वाल यांच्या धाब्याजवळ वर्धेवरून देवळीच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या कारने मालवाहू वाहनाला धडक दिली.या धडकेत मालवाहू ऑटो रस्त्याच्या कडेला जाऊन धडकला तर कार शंभर मीटर अंतरावर जाऊन उलटली.

या अपघातात ऑटो चालक विजय दाते यांच्यासह मनीष दाते,जया दाते, आदित्य घडमोडे,अनिता घडमोडे,सीमा खोबरे,रेखा वरठी सह अन्य तीन मजूर जखमी झाले.तर कारमधील चालकासह दोघे जण जखमी झाले. या अपघाताची सावंगी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

Edited By - Naresh Shende

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Punha Shivajiraje Bhosle Collection : 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमा हाऊसफुल, वीकेंडला कमाई किती?

नाशिकमध्ये राजकीय भूकंप! दोन बड्या नेत्यांची पक्षातून हकालपट्टी, भाजपचं कमळ हाती घेण्याच्या तयारीत

Accident News : पुण्यात अपघाताचा थरार! दोन जणांचा जागीच मृत्यू, कारचा चक्काचूर

Maharashtra Live News Update: महाडमध्ये मनसे पधिकाऱ्याला मारहाण

Shocking: पोलिस चौकीसमोर मर्डर; बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या भावाची धारदार शस्त्राने केली हत्या, परिसरात खळबळ

SCROLL FOR NEXT