Leopard Attack News Saam Digital
महाराष्ट्र

Leopard Attack News: १२ पिंजरे.. भूलीचं इंजेक्शन तरीही पसार, अहमदनगर जिल्ह्यात नरभक्षक बिबट्याची दहशत

Leopard Attack News: अहमदनगर जिल्ह्यातील लोणी गावात बिबट्याने दहशत माजवली असून हल्ल्यात लहान मुलाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे ग्रामस्थांध्ये भीतीचं वातावरण आहे. वनविभागाकडून शर्थीचे प्रयत्न करूनही सहा दिवसांपासून बिबट्याचा शोध सुरू आहे मात्र अद्याप बिबट्या सापडलेला नाही.

Sandeep Gawade

Leopard Attack News

अहमदनगर जिल्ह्यातील लोणी गावात बिबट्याने दहशत माजवली असून हल्ल्यात लहान मुलाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे ग्रामस्थांध्ये भीतीचं वातावरण आहे. वनविभागाकडून शर्थीचे प्रयत्न करूनही सहा दिवसांपासून बिबट्याचा शोध सुरू आहे मात्र अद्याप बिबट्या सापडलेला नाही.

अहमदनगर जिल्ह्यातील लोणी गावात बिबट्याने मुलावर हल्ला केला होता. यात मुलाचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाने परिसरात तब्बल १२ पिंजरे लावले मात्र या पिंजऱ्यांमध्ये बिबट्या अडकला नाही. शेवटी भुलीचं इंजेक्शन मारण्यात आलं, त्यातूनही बिबट्या पसार झाला असून वन विभागाचे कर्मचारी त्याचा शोध घेत आहेत.

नगर जिल्ह्यातील लोणी परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा संचार असल्याचे (Ahmednagar) दिसून आले आहे. यात घराजवळील शेतात खेळत असलेल्या ९ वर्षीय चिमुकल्यावर बिबट्याने (Leopard) हल्ला केला. यात मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. लोणी परीसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. 

अहमदनगर जिल्ह्यातील लोणी गावातील घटना घडली आहे. महसुलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या गावातील ही धक्कादायक घटना आहे. रविवारी (१४ जानेवारी) सायंकाळी ही घटना घडली, अथर्व प्रवीण लहामगे (वय ९) असे मृत मुलाचे नाव आहे. अथर्व हा घराजवळच खेळत होता, यावेळी त्याच्यावर बिबट्याने हल्ला (Leopard Attack) केला. घराजवळील शेतात मुलावर बिबट्याचा हल्ला केला होता. मुलगा सापडत नसल्याने त्याचा शोध घेतला. दरम्यान रात्री दहा वाजता मुलाचा मृतदेह सापडला. (Forest Department) वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अनेक दिवसापासून बिबट्याचा परीसरात मुक्त संचार असल्याचे सांगितले जात आहे. याबाबत वन विभागाला माहिती देत बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र वन विभागाच्या हलगर्जीपणा मुलाच्या जिवावर बेतला आहे. वेळीच बिबट्याला जेरबंद केले असते तर घटना टळली असती. या घटनेनंतर नरभक्षक बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाने पिंजरा लावला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election Result : मुंबई कुणाची? ठाकरे, भाजप, शिंदे कुणाचा कोणत्या मतदारसंघात उमेदवार विजयी?

Broccoli Dishes: हिवाळ्यात सुपरफुड पेक्षा कमी नाही 'ब्रोकोली', आहारात समावेश करून पाहा

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: कर्जत-जामखेडमधून रोहित पवार विजयी

Ajaz Khan : सोशल मीडियावर हवा; मात्र राजकारणात डब्बागुल,'बिग बॉस' फेम अभिनेत्याचा दारूण पराभव

Tourist Spots: भारतातील सर्वाधिक भेट दिलेले 'ही' ५ पर्यटन स्थळ

SCROLL FOR NEXT