11th Admission 2026 Google
महाराष्ट्र

11th Admission 2026: दहावी पास विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी, बोर्डाने घेतला मोठा निर्णय

Maharashtra FYJC admission: दहावी पास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. अकरावी ऑनलाईन प्रवेश अर्जाला २१ मे पासून सुरूवात झाली आहे. त्यासंदर्भात बोर्डाने मोठा निर्णय घेतला आहे.

Sakshi Sunil Jadhav

शैक्षणिक सत्र २०२६-२७ साठी सुरू झाले आहे. त्यासाठी प्रवेश घेणाऱ्या अकरावीच्या विद्यार्थांसाठी ही महत्वाची माहिती आहे. शिक्षण संचालनालयाने ऑनलाईन प्रवेशाच्या नियमित फेरी १ च्या प्रक्रियेत मुदतवाढ केली आहे. आधी विद्यार्थ्यांना २२ मेपर्यंत नोंदणी करण्याची मुदर होती. या तीन दिवसांची वाढ करण्यात आली आहे. म्हणजेच तुम्ही ११ वीचा ऑनलाईन अर्ज २५ मे २०२६ पर्यंत संध्याकाळी ६ वाजेपर्यंत भरू शकता.

आत्तापर्यंत १.१३ लाखांपेक्षा अधिक नोंदण्या झालेल्या आहेत. बोर्डाने विद्यार्थ्यांसाठी अर्जाची मुदर आणखी वाढवली आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी अजुनही अर्ज भरले नसतील तर ते आता भरता येणार आहेत. तर पहिल्या फेरीची सुरुवात २१ मेपासून सुरू झाली आहे. त्यामध्ये २१ मे ते २३ मे या कालावधीत विद्यार्थ्यांना नोंदणी आणि अर्जातील दुरुस्तीसाठी मुदत देण्यात आली होती.

नोंदणी करताना अनेकांना तांत्रिक अडचणींना सामोरं जावं लागलं. त्यात सर्व्हरवर लोड आला. या समस्येमुळे काही विद्यार्थ्यांचे अर्ज पूर्ण करण्यात अडचणी येत होत्या. म्हणून मुदत ३ दिवस वाढवण्यात आली आहे.

गेल्या दोन दिवसांमध्ये प्रवेश संकेतस्थळावर मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि पालकांनी लॉगिन केल्यामुळे सर्व्हर डाऊन होण्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. तर दुसरीकडे अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेचा फज्जा उडाला. ११ वीच्या ऑनलाइन प्रवेशाचे शेवटचे दोन दिवस उरले असतानाच वेबसाईट ठप्प झाली. ही समस्या नंदुरबारमध्ये निर्माण झाली. त्यावेळी विद्यार्थ्यांसोबत पालकांनाही प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. मात्र त्यासाठी २५ मेपर्यंत तारखा वाढवण्यात आल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मुंबई गोवा महामार्गावरून वाहणाऱ्या पाण्यामुळे वाहतुकीस अडथळा

Pune Rain Alert : पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! ३ दिवस पावसाचा रेड अलर्ट, गरज असेल तरच घराबाहेर पडा

केतनच्या हत्येचे गूढ वाढले, पोलीस चक्रावले; लाय डिटेक्टर' टेस्टसाठी पोलीस कोर्टात

Ladki Bahin Yojana : जुलैची ३ तारीख उजाडली, लाडक्या बहि‍णींना जूनचे १५०० कधी मिळणार? तारीख आली समोर

Rain Alert : पुण्यासह रायगडला रेड अलर्ट; पुढील ७२ तास महत्त्वाचे, राज्यात पावसाची दमदार बॅटिंग

SCROLL FOR NEXT