Nagpur News  Saam TV
महाराष्ट्र

Nagpur News : मांजरीने चावा घेतल्याने ११ वर्षीय मुलाचा मृत्यू? नागपुरातील घटनेने खळबळ

Nagpur boy dies after cat Bite : श्रेयांशुचा मृत्यू मांजर चावल्याने झाला की आणखी खाही कारण आहे, हे अद्याप समोर आलेलं नाही. मृतदेहाचं एम्समध्ये शवविच्छेदन करण्यात आले आहे.

साम टिव्ही ब्युरो

पराग ढोबळे | नागपूर

Nagpur News :

नागपूरमध्ये 11 वर्षीय मुलाचा विचित्र पद्धतीने मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. मांजरीने चावा घेतल्यानं या मुलाचा मृत्यूचा अंदाज वर्तवला जात आहे. हिंगणा तालुक्यातील उखडी गावात हा धक्कादायक प्रकार घडला आहे.

श्रेयांशु पेंदाम असं या बालकाचं नाव आहे. शवविच्छेदनाचा अहवालानंतर मुलाच्या मृत्यूचा कारणाचा खुलासा होईल. श्रेयांशु आपल्या मित्रासोबत घराजवळच खेळत होता. खेळता-खेळता मांजरीने त्याच्या पायाला चावा घेतला. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मांजरीने चावा घेतल्यानंतर श्रेयांशू घरी आला आणि घडलेला प्रकार आईला सांगितला. काही वेळात श्रेयांशूला मळमळ आणि उलट्या सुरू झाल्या. आई-वडील त्याला तातडीने लता मंगेशकर रुग्णालयात नेले. मात्र, डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. हिंगणा पोलिस ठाण्यात याबाबत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. (latest marathi news)

मांजरीने चावा घेतल्यानंतर श्रेयांशू घाबरला असेल आणि त्याला उलट्या सुरू झाल्या असतील. उलटी बाहेर न येता घशातून श्वसन नलिकेत जाऊन श्वास रोखल्याने किंवा आणखी काही कारणामुळे त्याचा मृत्यू झाला असावा असा अंदाज वर्तवला जात आहे. मात्र शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच श्रेयांशूच्या मृत्यूचं खरं कारण समोर येईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IAS TRANSFERS: राज्यातील पाच IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणाची कुठे नियुक्ती वाचा

ED Raids : माजी आयुक्त अनिलकुमार पवारांच्या घरी ईडीचा छापा; संपत्ती जाणून डोळे पांढरे होतील, वाचा स्पेशल रिपोर्ट

Maharashtra Live News Update: ठाण्याच्या नवीन जिल्हाधिकारी म्हणून श्रीमंती अशिमा मित्तल यांची नियुक्ती

Tariff : ट्रम्पचा धक्का, भारताला फटका? कोण-कोणत्या उद्योगांवर होणार परिणाम, जाणून घ्या

Ladki Bahin Yojana : राज्यातील ५० लाख बहिणी अपात्र ठरल्या; काय आहे नेमकं कारण? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT