wardha , hsc exam saam tv
महाराष्ट्र

HSC Exam 2023 : वर्धा जिल्ह्यात बारावीतील अकरा कॉपीबहाद्दर विद्यार्थी निलंबित

१२ वी बोर्ड परीक्षेच्या रसायनशास्त्र या विषयाचा पेपरसाठी वर्धा जिल्ह्यामध्ये ५५ केंद्रावर १६४५२ विद्यार्थी प्रविष्ठ होते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

- चेतन व्यास

Wardha : सध्या बारावीची परीक्षा (HSC Exam 2023) सुरु आहे. या परीक्षेदरम्यान कॉपीमुक्त अभियान रबविल्या जातं असून प्रशासनाने परीक्षा केंद्रावर 44 बैठे पथक तर सहा भरारी पथकची नियुक्ती केली आहे. बुधवारी रसायनशास्त्र आणि राज्यशास्त्र या विषयाच्या परीक्षेदरम्यान विविध परीक्षाकेंद्रावर 11 विद्यार्थी कॉपी करताना आढळले. या विद्यार्थ्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. (wardha latest marathi news)

१२ वी बोर्ड परीक्षेच्या रसायनशास्त्र या विषयाचा पेपरसाठी वर्धा (wardha) जिल्ह्यामध्ये ५५ केंद्रावर १६४५२ विद्यार्थी प्रविष्ठ होते त्यापैकी १६३८५ हजर होते व ६७ विद्यार्थी गैरहजर होते. अतिसंवेदनशील व संवेदनशील असे एकूण ४४ परीक्षा केंद्रावर बैठे पथक नियुक्त करण्यात आले होते. (Maharashtra News)

तसेच विभागीय मंडळांनी नियुक्त केलेले ६ भरारी पथके यांनी वेगवेगळ्या केंद्रास भेटी दिल्या. शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांच्या भरारी पथकाने मॉडेल हायस्कूल, आर्वी येथे भेट दिली असता २ विद्यार्थी कॉपी करताना आढळून आले तर आदर्श हायस्कूल, आंजी येथील दुपारच्या सत्रात सुरू असणारा राज्यशास्त्रच्या पेपरला २ कॉपीबहाद्दरला रंगेहाथ पकडले.

उपशिक्षणाधिकारी (माध्यमिक) जि. प. वर्धा यांच्या भरारी पथकांनी वायगाव (नि) येथे स्व. भैय्यासाहेब उरकांदे क. महाविद्यालय येथे भेट दिली असता तेथे ३ कॉपीबहाद्दरवर कारवाई केली. बुरकोणी येथील संत साईबाबा महाविद्यालय येथील ४ कॉपीबहाद्दरवर कारवाई केली. असे एकूण बारावीच्या 11 विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gajkesri Rajyog 2025: 22 जुलैला बनणार पॉवरफुल गजकेसरी राजयोग; 'या' ३ राशींना मिळणार पैसाच पैसा

Akola News : कापसाच्या सघन लागवडीचा 'अकोला पॅटर्न'; 'सघन' पद्धत आणि पारंपारिक पद्धतमधील फरक काय?

Maharashtra Politics: राजकारणात नवा ट्विस्ट: उद्धव-राज युतीवर सस्पेन्स कायम, शिंदेंची नजर

Ramdas Athawale: महाराष्ट्रात दादागिरी चालणार नाही; मराठीच्या मुद्द्यावरून रामदास आठवलेंनी राज ठाकरेंना ठणकावलं

Maharashtra Politics : शरद पवारांना मोठा धक्का; राष्ट्रवादीला खिंडार, शेकडो कार्यकर्त्यांची भाजपमध्ये एन्ट्री

SCROLL FOR NEXT