Nagpur Doctor Strike : सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाचा आजचा तिसरा दिवस आहे. यामुळे सामान्य जनतेचे प्रचंड हाल होत आहेत. अनेक सरकारी रुग्णालयांमध्ये रुग्णांची मोठी गैरसोय होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. अशीच काहीशी स्तिथि नागपूरच्या मेडिकलमध्ये पाहायला मिळत आहे. (Latest Marathi News)
नागपूरच्या (Nagpur) मेडीकल या शासकीय रुग्णालयात गेल्या २४ तासांत ११ रुग्णांच्या मृत्युची नोंद झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. काल सकाळी ८ पासून ते आज सकाळी ८ पर्यंत ११ जणांचा मृत्यु झाला आहे.
तर संपाच्या पहिल्या दोन दिवसांत २५ रुग्णांचा मृत्यू झालाय. नागपूर मेडीकलमध्ये रोज सरासरी ८ ते १० रुग्णांचा मृत्यु होतात. मात्र, संपाच्या काळात या मृत्युच्या प्रमाणात थोडी वाढ झाली. ही बाब नागपूर मेडीकल शासकीय रुग्णालयाचे (Hospital) अधिष्ठाता डॉ. राज गजभीये यांनी मान्य केली आहे. पण हे रुग्ण उपचाराअभावी दगावले नाहीत तर ते गंभीर होते असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
नागपूर मेडीलमधील ९०० नर्सेस संपावर गेले आहे. त्यामुळे खाजगी महाविद्यालयातील नर्सिंगचे विद्यार्थी आणि MBBS च्या विद्यार्थ्यांना आरोग्य सेवेत लावण्यात आलं आहे असंही डॉ. गजभीये यांनी सांगितलं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.