SSC Result 2025 Saam tv
महाराष्ट्र

10th SSC Result: दहावीचा निकाल एक-दोन नाही तर या ६ वेबसाईटवर बघता येणार

SSC Result 2025: दहावीचा निकाल १३ मे रोजी दुपारी १ वाजता जाहीर होणार आहे. या निकालाकडे विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष लागले आहे. हा निकाल विद्यार्थ्यांना कोणकोणत्या वेबसाईटवर बघायला मिळणार हे जाणून घ्या...

Priya More

दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. कारण दहावीच्या विद्यार्थ्यांची आणि पालकांची निकालाबाबतची प्रतीक्षा संपली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या दहावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल उद्या म्हणजे १३ मे रोजी जाहीर होणार आहे. उद्या दुपारी १ वाजता विद्यार्थी ऑनलाईन पद्धतीने निकाल पाहू शकणार आहेत. विद्यार्थ्यांना कोणकोणत्या अधिकृत वेबसाईटवर निकाल पाहायला मिळणार आहे ते आपण जाणून घेणार आहोत...

दहावीचा निकाल उद्या जाहीर होणार असल्यामुळे काही विद्यार्थी आणि पालकांची उत्सुकता वाढली आहे तर काहींची धाकधुक वाढली आहे. उद्या सकाळी ११ वाजता बोर्डाची पत्रकार परिषद होणार आहे. या पत्रकार परिषदेत निकाल जाहीर करण्यात येणार आहे. राज्यातील २३ हजार ४९२ माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यंदा १६ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली आहे. उद्या निकाल जाहीर असून विद्यार्थ्यांना दुपारी १ वाजता वेबसाईटवर जाऊन त्यांचे गुण पाहायला मिळतील.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने यावर्षी २१ फेब्रुवारी ते १७ मार्च २०२५ दरम्यान दहावीच्या परीक्षा घेतल्या होत्या. या परिक्षेला राज्यातील १६.११ लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यामध्ये ८.६ लाख मुलं, ७.४७ लाख मुली आणि १९ ट्रान्सजेंडर यांचा समावेश होता. दहावीच्या विद्यार्थ्यांना mahresult.nic.in आणि mahahsscboard.in या अधिकृत वेबसाईटवरून निकाल पाहता आणि डाउनलोड करता येणार आहे. त्याचसोबत विद्यार्थ्यांना आणखी काही वेबसाईटवर हा निकाल पाहयला मिळणार आहे.

या वेबसाईटवर पाहू शकता निकाल -

- digilocker.gov.in

- mahahsscboard.in

- mahresult.nic.in

- msbshse.co.in

- mh-ssc.ac.in

- sscboardpune.in

डिजीलॉकरवरुन डाउनलोड करा निकाल -

 डिजिलॉकर या वेबसाइट किंवा अॅपवर जा.

डिजिलॉकरवर जाऊन अपार आयडी लॉग इन करायचा आहे.

यानंतर SSC Result असं टाइप करा.

यानंतर तुमचा सीट नंबर टाका.

सीट नंबरनंतर काही आवश्यक माहिती भरा. यानंतर तुमचा निकाल दिसेल.

निकाल डाउनलोड करुन ठेवा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope : दिवसभरात मोठा निर्णय घेणे टाळा, मनातील इच्छा पूर्ण होतील; ५ राशींच्या लोकांची स्वप्न होणार पूर्ण

Crime: विवाहित महिलेवर सामूहिक बलात्कार, गॅस सिलिंडर देतो म्हणत सोबत नेलं; अत्याचार करत व्हिडीओ काढले अन्...

शौर्यगाथा कार्यक्रमावरून राजकारण तापलं; मनसे नेते राजू पाटील यांचा भाजपवर जोरदार निशाणा

LPG Rule Change: मोठी बातमी! सर्वसामान्यांना मोठा झटका, गॅस सिलिंडरच्या नियमात बदल

मातृदिनी आई हळहळली! तुळजापुरात 19 वर्षीय तरुणाची हत्या|VIDEO

SCROLL FOR NEXT