SSC-HSC Board Exam 2023 : दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी समोर आली आहे. परीक्षा कॉपीमुक्त करण्यासाठी प्रशासन सज्ज झाले असून प्रत्येक केंद्रावर बैठे पथक तैनाद करण्याचे आदेश प्रशासनाकडून देण्यात आले आहे. याशिवाय प्रत्येक परीक्षा केंद्राच्या परिसरातील १०० मीटरच्या अंतरावर कुठलेही झेरॉक्स मशीन दुकान सुरू राहणार नाहीये. (Latest Marathi News)
बोर्डाच्या या निर्णयामुळे कॉफी बहाद्दरांना आळा बसणार आहे. याशिवाय कॉपीमुक्त परीक्षेसाठी राज्यातील सर्वच परीक्षा केंद्रावर मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात येणार आहे. विद्यार्थ्याव्यतिरिक्त अन्य गर्दी होऊ नये म्हणून परिसरात कलम १४४ लागू केले जाणार आहे.
इयत्ता १२ वी (HSC Exam) अर्थात उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा २१ फेब्रुवारी तर १० वी (SSC Exam) अर्थात माध्यमिक शालांत परीक्षा २ मार्च पासून सुरु होत आहे. या दोन्ही परीक्षांसाठी प्रशासनाची सज्जत्ता आहे. प्रत्येक परीक्षा केंद्रावर तीन शासकीय कर्मचाऱ्यांचे बैठे पथक नियुक्त करण्यात येईल, असंही बोर्डाकडून सांगण्यात आलं आहे.
अनेक केंद्रांवर परीक्षेवेळी विद्यार्थ्यांना खुलेआम बिनधास्तपणे कॉपीचा पुरवठा केला जातो. याचा परिणाम हुशार विद्यार्थ्यांना भोगावा लागत आहे. त्याच्या अभ्यासाच्या मानसिकतेवरही परिणाम होत आहे. स्पर्धात्मक युगात टिकायचे असेल तर कॉपीसारखे गैरप्रकार टाळून हुशार विद्यार्थ्यांवर होणारा अन्याय कमी करण्यासाठी यंदा परीक्षा मंडळाने प्रथमच कॉपीमुक्तीसाठी परीक्षा केंद्रांवर पर्यवेक्षकांसह मोबाइल ॲप कॅमेऱ्याचेही लक्ष राहणार आहे.
यंदा कोणत्या सवलती कमी करण्यात आल्या?
कोव्हिड प्रादुर्भावामुळे विद्यार्थ्यांना गेल्या दोन वर्षांच्या परीक्षांदरम्यान देण्यात आलेल्या सवलती यंदा मिळणार नाहीत. परीक्षा पूर्ण अभ्यासक्रमावर घेतल्या जाणार आहेत. तसेच पेपरसाठी देण्यात आलेला अतिरिक्त वेळ यंदा मिळणार नसून, परीक्षा तीन तासांमध्येच होणार आहे. त्याचप्रमाणे प्रश्नपत्रिका व्हायरल होण्याचा धोका टाळण्यासााठी यंदा परीक्षेपूर्वी दहा मिनिटे आधी प्रश्नपत्रिका मिळणार नाहीत, तर त्या वेळेवर दिल्या जाणार आहेत.
Edited By - Satish Daud
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.