माकड छातीवर बसल्याच्या भितीनं 10 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू! संतोष जोशी
महाराष्ट्र

माकड छातीवर बसल्याच्या भितीनं 10 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू!

नांदेडमध्ये अंगावर माकड येऊन बसल्याच्या भिती मनात बसल्यानं एका चिमुकल्याचा बळी गेला आहे. मुदखेड तालुक्यातील बारड गावातील ही ह्रदयद्रावक घटना काल घडली आहे.

संतोष जोशी

संतोष जोशी

नांदेड: नांदेडमध्ये Nanded अंगावर माकड येऊन बसल्याच्या भिती मनात बसल्यानं एका चिमुकल्याचा बळी गेला आहे. मुदखेड Mudkhed तालुक्यातील बारड गावातील ही ह्रदयद्रावक घटना काल घडली आहे. गावातील दहा वर्षीय वीर नागेश संगेवार हा चार दिवसांपूर्वी घरासमोर खेळत असताना एक माकड त्याच्या अंगावर येऊन बसले, त्या नंतर वीरने भयंकर धास्ती घेतली, त्यातच त्याला ताप आल्याने नांदेडच्या खाजगी रुग्णालयात दाखल केले.

हे देखील पहा -

या दरम्यान ताप आल्यानं विरच्या विविध आजाराच्या तपासण्या करण्यात आल्या मात्र, त्या सर्व चाचण्या नॉर्मल आल्या. माकडांबद्दलची त्याच्या मनातील दहशत कमी झाली नव्हती. काल त्याचा ह्रदय विकाराच्या Heart attack झटक्याने त्याचा मृत्यू झाला.

त्याच्या मनात माकडं अंगावर बसल्याने भिती बसली होती त्यातच ह्दय विकाराचा झटका आल्याने मृत्यू झाल्याचे कुटुंबियांनी सांगितले. बारड गाव वनराईनं संपन्न आहे याठिकाणी माकडांचा कायम उच्छाद असतो यापुर्वी ही गावात माकडाच्या हल्ल्यात अनेक जण जखमी झालेले आहेत.

ग्रामपंचायतीकडील माकडांना हुसकावून लावण्यासाठी एक कर्मचारी ही ठेवला होता अशी माहिती गावकऱ्यांनी दिली आहे. दरम्यान, विरच्या अचानक झालेल्या दुर्देवी मृत्यू मुळे गावकऱ्यांतेन हळहळ व्यक्त होत आहे.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दुष्काळग्रस्त भागांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय; कोणत्याही रेशन दुकानात मिळणार धान्य

Maharashtra News Live Update: भाजपने आणीबाणीलाही मागे टाकले, आशुतोष रांकांचा गंभीर आरोप

CNG कार चालकांचा थरकाप उडवणारी बातमी! धावत्या कारने अचानक घेतला पेट, चालकाचा जागीच कोळसा

Amravati Crime: इंजिनिअर मुलाचं आईसोबत भयंकर कृत्य, घरातील दृश्य पाहून सर्वजण हादरले

Kidney disease symptoms: किडनी निकामी होण्यापूर्वीच सावध व्हा; 'या' 3 टेस्ट देतील जीवनदान

SCROLL FOR NEXT