बुलढाण्यात " एक विद्यार्थी एक वृक्ष" मोहिमेला सुरुवात...   संजय जाधव
महाराष्ट्र

बुलढाण्यात " एक विद्यार्थी एक वृक्ष" मोहिमेला सुरुवात...

५ लाख १४ हजार विद्यार्थी होणार कार्यक्रमात सहभागी.

संजय जाधव, साम टीव्ही

बुलढाणा : जिल्ह्यामध्ये" एक विद्यार्थी एक वृक्ष" 1 student 1 tree या अभिनव मोहिमेची १५ ऑगस्ट पासून सुरुवात करण्यात आली आहे. जिल्हा प्रशासन, शिक्षण विभाग आणि सामाजिक वनीकरण यांच्या संयुक्त पुढाकाराने आजपासून संपूर्ण बुलढाणा Buldhana जिल्ह्यात 'एक विद्यार्थी एक वृक्ष' ही अभिनव वृक्ष क्रांती मोहीम शालेय विद्यार्थ्यांच्या सहकार्याने राबविण्यात येणार आहे.

हे देखील पहा-

या भारत वृक्षक्रांती मोहिमेचे तथा एक विद्यार्थी एक वृक्ष या संकल्पनेचे मुख्य प्रवर्तक ए. एस. नाथन यांच्या संकल्पनेमधून ही मोहीम संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यामध्ये राबविला जाणार आहे. आज पालकमंत्री डॉ राजेन्द्र शिंगणे Dr. Rajendra Shingane आणि जिल्हाधिकारी एस. रामामुर्थी यांच्या हस्ते या मोहिमेची सुरुवात झाली आहे. या वृक्षक्रांती मोहिम मध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला एक मोफत रोप देण्यात येणार आहे.

जिल्ह्यात ५ लाख १४ हजार विद्यार्थी यामध्ये सहभागी होणार आहेत. शालेय विध्यार्थ्यानी हे झाड लावून त्याच संवर्धन करायचे आहे. या मोहिमेत सहभागी होणाऱ्या, सर्व विद्यार्थ्यांना शालेय स्तरावर विशेष गुण देण्यात येणार आहेत. ही मोहिम सर्व शाळांच्या विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा प्रशासन आणि शिक्षण विभाग, वन विभाग आणि सामाजिक वनीकरण विभाग आणि वृक्षक्रांती मिशन यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Edited By- digambar jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident: भरधाव कार धरणात कोसळली, ४ पोलिसांचा बुडून मृत्यू; नेमकं काय घडलं?

Farmers KYC Deadline: उरले शेवटचे ५ दिवस! पुसग्रस्त शेतकऱ्यांनो ईकेवायसी करा, अन्यथा मिळणार नाही नुकसान भरपाई

Konkan Tourism : गुलाबी थंडीत जोडीदारासोबत कोकणातील 'हे' ठिकाण फिरायला अजिबात विसरू नका

मोठा राजकीय भूकंप! क्षीरसागरांची वेगळीच चूल; निवडणुकीत चौरंगी लढत

Maharashtra Live News Update: यवतमाळ जिल्हा परिषदेचे 21 कर्मचारी निलंबित

SCROLL FOR NEXT