राज्यात पुन्हा लॉकडाऊन लावावा लागू नये, यासाठी खबरदारी घ्या, स्वातंत्र्यदिनी मुख्यमंत्री ठाकरेंचं आवाहन

मागील दीड वर्षापासून कोरोनाचे संकट आहे. त्यामधून मुक्त होण्याकरिता आपण प्रयत्न करत आहोत.
राज्यात पुन्हा लॉकडाऊन लावावा लागू नये, यासाठी खबरदारी घ्या, स्वातंत्र्यदिनी मुख्यमंत्री ठाकरेंचं आवाहन
राज्यात पुन्हा लॉकडाऊन लावावा लागू नये, यासाठी खबरदारी घ्या, स्वातंत्र्यदिनी मुख्यमंत्री ठाकरेंचं आवाहनSaam Tv
Published On

मुंबई : मागील दीड वर्षापासून कोरोनाचे Corona संकट आहे. त्यामधून मुक्त होण्याकरिता आपण प्रयत्न करत आहोत. १६ ऑगस्टपासून राज्यामधील State काही बंधने शिथिल होत आहेत. पण कोरोनाचे संकट अजून देखील टळलेले नाही. शिथिलतेमध्ये आवश्यक असलेले, निर्बंध Restrictions पाळावे लागणार आहेत. कारण ऑक्सिजनचा oxygen पुरवठा त्या मर्यादेच्या पुढे गेलेला आहे.

तर कदाचित आपल्याला लॉकडाऊन Lockdown पुन्हा लावावा लागणार आहे. असा इशारा मुख्यमंत्री CM उद्धव ठाकरे Uddhav Thackeray यांनी यावेळी दिला आहे.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज मंत्रालयात Ministry ध्वजारोहण पार पडले आहे. त्यावेळेस ते बोलत होते की, स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने राज्यामधील ४ पोलिसांना Police राष्ट्रपती पदके Presidential Medal ​मिळाली आहेत. त्याबरोबर पोलीस खात्यामधील अजून ४० ते ४५ पोलीस खात्यातील बहाद्दर आहेत.

हे देखील पहा-

त्यांचे अभिनंदन करतो, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. मागीलवर्षी आणि या वर्षी दुसऱ्या लाटेत आपण कोरोनाचा कहर चांगलाच अनुभवला आहे. आता काही प्रमाणात औषधे उपलब्ध झाली असले, तरी पण ऑक्सिजन क्षमता अजून देखील कमी आहे. ऑक्सिजनचे प्रमाण लक्षात घेऊन, आपण निर्बंधात शिथिलता आणत आहे. कोरोनाचे संकट अजून देखील टळलेले नाही.

परदेशात काही ठिकाणी ते नव्याने पद्धतीने उसळलेले आहे. आपल्याकडे हे संकट नव्याने उसळू नये, याकरिता काळजी आपल्या सर्वांना घ्यायची आहे. असे आवाहन करतानाच ऑक्सिजनचा पुरवठा त्या मर्यादेच्या पुढे गेला, तर कदाचित आपल्याला लॉकडाऊन पुन्हा लावावा लागणार आहे, असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिला आहे. कोरोनाशी लढताना एका गोष्टीचे समाधान आहे की लसीकरणानं वेग घेतला आहे.

राज्यात पुन्हा लॉकडाऊन लावावा लागू नये, यासाठी खबरदारी घ्या, स्वातंत्र्यदिनी मुख्यमंत्री ठाकरेंचं आवाहन
१२ आमदारांच्या यादी बाबत राज्यपालांकडून खुलासा! पहा काय म्हणाले राज्यपाल

कालच राज्याने साडेनऊ लाख लोकांना लसीकरण करून एक वेगळा उच्चांक प्रस्थापित केलेला आहे. आज अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण करत आहोत. आज सगळ्यांनी निश्चय केले पाहिजे की, मी माझा देश कोरोनामुक्त करणारच आणि पुढचा स्वातंत्र्यदिन मुक्त वातावरणात उत्साहात साजरा करणारच ही प्रतिज्ञा आपण करुया, असे आवाहन यावेळी मुख्यमंत्र्यांनी केले आहे. कोरोनाच्या संकटाचा सामना करण्यासाठी अनेक कोरोना योद्ध्यांनी दिवसरात्र संघर्ष केलेला आहे. अनेकांना कोरोनाची बाधा झाली. यामध्ये काहीजण बरे झाले, काही जण दुर्देवाने शहीद झाले त्यांनाही मी श्रद्धांजली वाहतो, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी म्हटले आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com