1 March New Rules
1 March New Rules Saam TV
महाराष्ट्र

1 March New Rules : १ मार्चपासून होणार ५ मोठे बदल, थेट तुमच्या खिशावर होणार परिणाम, जाणून घ्या...

साम टिव्ही ब्युरो

1 March New Rules : फेब्रुवारी महिना संपायला आता फक्त एक दिवसाचा कालावधी शिल्लक आहे. उद्यापासून म्हणजेच बुधवारपासून मार्च महिन्याला सुरूवात होणार आहे. तसं पाहता सरकारकडून प्रत्येक महिन्याच्या सुरूवातीला काही नियम बदलले जातात. या नियमांमुळे कधी सर्वसामन्यांना दिलासा मिळतो तर कधी या बदलाचा परिणाम थेट आपल्या खर्चावर होतो. यावेळी देखील १ मार्चपासून सरकारकडून काही महत्वाचे बदल होण्याची शक्यता आहे. चला तर मग सविस्तर जाणून घेऊया या बदलांविषयी...(Latest Marathi News)

बँक कर्ज महागण्याची शक्यता

नुकतेच आरबीआय म्हणजेच रिझर्व्ह बँकेने रेपो दरात वाढ केली आहे. त्यानंतर अनेक बँकांनी त्यांचे MCLR दर वाढवले ​​आहेत. याचा थेट परिणाम कर्ज आणि ईएमआयवर होईल. ईएमआयचा बोजा आणि कर्जाचे वाढते व्याजदर यामुळे सर्वसामान्यांना त्रास होऊ शकतो. कर्जाचे हप्ते वाढू शकतात.

गॅस सिलिंडरच्या दरात वाढ होणार?

प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला भारतीय पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाचे दर जारी केले जातात. यामध्ये बहुतांश वेळा गॅसचे दर निश्चित केले जातात. गेल्या वेळी एलपीजी सिलिंडरच्या दरात वाढ झाली नव्हती. त्यामुळे या महिन्यात गॅसच्या दरात मोठी वाढ होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. असं झालं तर सर्वसामान्यांना महागाईच्या झळा बसू शकतात.

२ हजार रुपयांची नोट फक्त बॅकेतच मिळणार

१ मार्चपासून २०० रुपयांच्या नोटांबाबत मोठा निर्णय घेतला जाऊ शकतो. ग्राहकांना १ मार्चपासून शक्यतो एटीएममधून २ हजार रुपयांच्या नोटा मिळणार नाही. यासाठी ग्राहकांना बँकेत जावं लागेल. या निर्णयामागील कारण स्पष्ट करताना बँकेने सांगितले की, एटीएममधून २००० रुपयांची नोट काढल्यानंतर ग्राहक शाखेत येतात आणि त्याचे सुट्टे घेतात. अशातच बऱ्याच वेळा ग्राहकांना अडचणीचा सामना करावा लागतो. हे थांबवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

विशेष रेल्वेगाड्या सुरू होतील

मार्च महिन्यात होळीचा सण आहे. गेल्या दोन वर्षात कोरोना महामारीमुळे होळीचा सण साजरा करता आला नाही. यंदा होळीचा सण उत्साहात साजर केला जाणार आहे. हे लक्षात घेऊन भारतीय रेल्वेने १ मार्चपासून होळीसाठी अनेक विशेष गाड्या सुरू करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे महानगरांमध्ये काम करणाऱ्या लोकांना त्यांच्या घरी जाण्याची खूप सोय होणार आहे. रेल्वेने विविध मार्गांवर विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या गाड्या दिल्ली, मध्य प्रदेश, मुंबईसह अनेक मार्गांदरम्यान धावतील.

बँका राहणार बंद

मार्च महिन्यात, धुळवंड, होळी तसेच नवरात्रीसारखे अनेक मोठे सण असतात. त्यामुळे मार्चमध्ये बँकांना मोठ्या प्रमाणात सुट्टी असते. यंदाही मार्च महिन्यात तब्बल १२ दिवस बँका बंद राहतील. अशा परिस्थितीत, जर तुम्ही बँकेशी संबंधित कोणतेही काम बऱ्याच काळापासून पुढे ढकलत असाल तर ते त्वरित पूर्ण करुन घ्या. नाहीतर तुमचे काम लांबणीवर पडू शकते.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Milk Side Effect : दूधासोबत 'हे' पदार्थ चुकूनही खाऊ नका; अन्यथा आयुष्यभर पश्चाताप होईल

Sleeping pills: तुम्ही देखिल झोपेच्या गोळ्या खाताय? होऊ शकतो शरीरावर दुष्परिणाम

Today's Marathi News Live : गोंदियामध्ये केमिकल कंपनीला भीषण आग

Sharad Pawar on Narendra Modi: मोदींनी तरी कुठे कुटुंब सांभाळलं; 'त्या' टीकेला शरद पवारांचं सडेतोड उत्तर

Water Crisis Hits Maharashtra: पाणीसाठ्यात घट, नंदुरबारमध्ये 195 गावांना टंचाईच्या झळा; मालेगाव, हरसुलमध्ये भीषण स्थिती

SCROLL FOR NEXT