Varsova Politics Saam Tv
Maharashtra Assembly Elections

Varsova Politics: बंडखोरीमुळे बदलली वर्सोवा मतदारसंघाची राजकीय समीकरणे! मत विभाजनाचा आणि नाराजीचा फायदा मनसेला होणार फायदा?

Maharashtra Assembly Election: वर्सोवा मतदारसंघात बंडखोरी झाली आहेत. राजू पेडणेकर यांनी बंडखोरी केल्याने राजकीय समीकरणे बदलली आहेत.

Siddhi Hande

संजय गडदे, साम टीव्ही प्रतिनिधी

मुंबईच्या पश्चिम उपनगरातील वर्सोवा विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे माजी नगरसेवक राजू पेडणेकर यांनी बंडखोरी केल्यामुळे वर्सोवा विधानसभा मतदारसंघाची राजकीय समीकरणे बदलली आहेत. वर्सोवा मतदार संघात भाजपा महायुतीकडून भारती लवेकर, शिवसेना ठाकरे गटाकडून हारून खान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून संदेश देसाई तर एमआयएम कडून रईस लष्करीया हे मैदानात उतरले आहेत. यात चौरंगी लढतीची थेट शक्यता होती मात्र राजू पेडणेकर यांनी केलेल्या बंडखोरीमुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर मत विभाजणी होणार असल्याने या मतविभाजिनीचा फायदा मनसे उमेदवार घेणार का हाच प्रश्न आता मतदारसंघात चर्चेला जात आहे.

सात महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत वर्सोवा विधानसभा क्षेत्रातून महाविकास आघाडीच्या उमेदवाराला बावीस हजारांपेक्षा अधिक मतांची आघाडी मिळाली होती वर्सोवा विधानसभा मतदारसंघाची निर्मिती झाल्यापासून या ठिकाणी दोन वेळा काँग्रेसचा आमदार राहिला आहे तर दोन वेळा भाजपाचा आमदार राहिला आहे मात्र लोकसभेत महाविकास आघाडीला मिळालेल्या मताधिक्य पाहिल्यानंतर या ठिकाणी काँग्रेस कडून सर्वाधिक 40 पेक्षा अधिक जणांनी पक्ष नेतृत्वाकडे उमेदवारीसाठी अर्ज दिले वर्सोवा मतदार संघ काँग्रेसला मिळावा यासाठी काँग्रेस नेतृत्वाने शेवटपर्यंत शिवसेना ठाकरे गटासोबत वाटाघाटी केल्या मात्र शेवटच्या दिवशी वर्सोवा मतदारसंघ शिवसेना ठाकरे गटाच्या वाट्याला गेला या ठिकाणी शिवसेनेकडून इच्छुक असलेल्या बाळा आंबेडकर माजी विरोधी पक्षनेते राजूल पटेल माजी आरोग्य समिती अध्यक्ष, राजू पेडणेकर माजी नगरसेवक, शैलेश फणसे माजी स्थायी समिती अध्यक्ष यांना संधी न देता मतदार संघाबाहेरील हरून खान यांना अल्पसंख्यांक उमेदवार म्हणून ठाकरे गटाकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली. यामुळे शिवसेना ठाकरे गटात देखील मोठी नाराजी आहे.

वर्सोवा मतदार संघ काँग्रेसचा असताना तो काँग्रेसच्या वाट्याला न येता शिवसेना ठाकरे गटाला गेला यामुळे या ठिकाणी काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे महायुती मधून शिवसेना शिंदे गड देखील या जागेवर लढण्यास इच्छुक होता त्यांनाही मतदारसंघ न मिळाल्यामुळे शिंदे गटात देखील मोठ्या प्रमाणावर नाराजी पसरली आहे शिवसेना ठाकरे गटाने अंधेरी पश्चिम मधील हरून खान यांना उमेदवारी दिल्यामुळे ठाकरे गटाकडून निवडणूक लढण्यास इच्छुक असणारे अनेक पदाधिकारी देखील नाराज असल्याची चर्चा आहे. शिवाय भाजपा महायुतीकडून दोन वेळा आमदार राहिलेल्या भारतीय लवेकर यांची उमेदवारी कापली जाईल अशी चर्चा असताना शेवटच्या यादीमध्ये भारती लवेकर यांचे अनपेक्षित पणे नाव आल्यामुळे भाजपात देखील अनेक नाराज झाले आहेत एकंदरीत भाजप शिवसेना ठाकरे गट शिवसेना शिंदे गट या सर्वच पक्षात मोठ्या प्रमाणावर मतदार संघात अंतर्गत नाराजी आहे या नाराजीचा फायदा मनसे कशा पद्धतीने घेतो याकडे आता मतदारसंघातील मतदारांचे लक्ष लागले आहे.

अल्पसंख्यांक आणि मराठी मतात होणार मतविभाजने

वर्सोवा विधानसभा मतदारसंघाचा विचार केला असता या मतदारसंघात सर्वाधिक एक लाख 57 हजार अल्पसंख्यांक मुस्लिम समुदायाची मते आहेत. जवळपास 65 हजार मराठी तर उत्तर भारतीयांची साधारणपणे एक लाख इतकी मते या मतदारसंघात आहेत. यापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत समाजवादी पक्ष आणि एम आय एम यांनी उमेदवार दिल्यामुळे दोन वेळा काँग्रेस उमेदवाराचा या ठिकाणी पराभव झाला आणि त्याचा फायदा महायुतीच्या भारती लवेकर यांना झाल्यामुळे त्या आमदार झाल्या मात्र लोकसभा निवडणुकीत मुस्लिम मतदारांनी महाविकास आघाडीला साथ दिली. आता पुन्हा या ठिकाणी एम आय एम कडून राईस लष्करीया यांना संधी देण्यात आली आहे. पुन्हा मुस्लिम मतांची विभागणी झाल्यास याचा फायदा महायुतीच्या लवेकर यांना होऊ शकतो मात्र मतदारसंघातील त्यांच्या कामाविषयी मतदारांमध्ये मोठी नाराजी देखील आहे. मतदार संघातील नाराजी, यासोबतच सर्व पक्ष कार्यकर्त्यांमध्ये दिलेल्या उमेदवारांवरून असणारी नाराजी, शिवसेना ठाकरे गटात झालेली बंडखोरी आणि त्यामुळे मराठी आणि हिंदू मतांमध्ये होणारी मते विभाजणी याचा फटका महाविकास आघाडीला म्हणजेच ठाकरेंच्या उमेदवाराला देखील बसू शकतो अशा परिस्थितीत नाराजी आणि मत विभाजनीचा फायदा मनसे उमेदवार संदेश देसाई कसा घेतात याकडे देखील मतदारसंघातील मतदारांचे लक्ष लागून राहिले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nana Patole : देवेंद्र फडणवीस स्वत: निवडून येणार नाहीत; अमित शहांच्या वक्तव्यावर नाना पटोले यांची पहिली प्रतिक्रिया

Maharashtra News Live Updates: मिरारोडमध्ये पोलिस ठाण्यात हाणामारी

Sambhaji Raje Chhatrapati : 'छत्रपती शिवरायांचे गुरु फक्त...'; अमित शहांच्या वक्तव्यावर संभाजीराजे छत्रपती यांची पहिली प्रतिक्रिया

IND vs SA 1st T20I: पहिला टी-२० सामना पावसामुळे धुतला जाणार? वाचा लेटेस्ट अपडेट

Maharashtra Election : महिला नेत्यांबद्दल अपमानास्पद वक्तव्ये केली तर कठोर कारवाई; निवडणूक आयोगाकडून गंभीर दखल

SCROLL FOR NEXT