Uddhav Thackeray Saam Tv
Maharashtra Assembly Elections

Maharashtra Election : ठाकरेंच्या शिवसेनेत मोठा भूकंप, ५२ पदाधिकाऱ्यांचा जय महाराष्ट्र, भाजपला जाहीर पाठिंबा!

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : धुळ्यात आणि नांदेडमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. ५२ पदाधिकाऱ्यांनी राजीनामा देत भाजपला पाठिंबा दर्शवला आहे.

Namdeo Kumbhar

Maharashtra Assembly Election 2024 : विधानसभा निवडणुका आता ऐन रंगात आल्या आहेत. प्रचाराचा धुरळा उडालाय. उद्धव ठाकरे यांनी कोकणातून प्रचाराचा शुभारंभ केलाय. ठाकरे एकीकडे प्रचारात व्यस्त असतानाच शिवसेनेत मोठा भूकंप झालाय. धुळ्यातील तब्बल ५२ पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिलाय. त्याशिवाय नांदेड येथील तीन मोठ्या पदाधिकाऱ्यांनही जय महाराष्ट्र केला आहे. विधानसभा निवडणूक सुरु असतानाच ठाकरेंना मोठा धक्का बसल्याचे बोलले जात आहे. धुळ्यातील ५२ पदाधिकाऱ्यांनी भाजपला पाठिबां दिलाय. तर नांदेडमधील पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.

शिवसेनाला जय महाराष्ट्र, भाजपला पाठिंबा -

धुळे शहरात शिवसेना ठाकरे गटात मोठा भूकंप झाला असून पक्षाच्या 52 पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत ठाकरे सेनेला जय महाराष्ट्र केला आहे. त्या ५२ जणांनी भाजपचे उमेदवार अनुप अग्रवाल यांना पाठिंबा दिला आहे. माजी आमदार अनिल गोटे यांना परस्पर उमेदवारी दिल्याने हे सर्व शिवसेना पदाधिकारी नाराज होते. गोटे यांनी अनेकवेळा शिवसेना पक्षावर जहरी टीका केल्यानंतर ठाकरे यांनी शिवसेनेची उमेदवारी दिल्याने पदाधिकारी नाराज झाले. शिवसेना ठाकरे गटाला धुळ्यात हा जबर धक्का मानला जात आहे. भाजपात प्रवेश न करता हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजप उमेदवार अनुप अग्रवाल यांचा प्रचार करणार असल्याचे यावेळी नाराज पदाधिकारी महेश मिस्त्री यांनी स्पष्ट केले आहे.

नांदेडमध्येही भगदाड

नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघात ठाकरे गटाला धक्का बसला आहे. कामगार सेनेचे जिल्हाप्रमुख आणि माजी नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला.

ठाकरे गटाच्या कामगार सेनेचे जिल्हाप्रमुख बाळासाहेब पावडे आणि माजी नगरसेवक बाळासाहेब देशमुख यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. नांदेड उत्तर मध्ये आयत्या वेळी बाहेरून आलेल्या संगीता पाटील डक यांना शिवसेना ठाकरे गटाने उमेदवारी दिल्याने निष्ठावंत शिवसैनिक नाराज झाले आहेत. त्यामुळे नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघात ठाकरे गटाला गळती लागली आहे. ठाकरे गटाने नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघात निष्ठावंताना डावलून धनदांडग्याना उमेदवारी दिल्याने त्यांना कंटाळून मोठ्या प्रमाणात ठाकरे गटाचे अनेक शिवसैनिक शिंदे गटात पक्ष प्रवेश करीत आहेत अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे नेते आमदार हेमंत पाटील यांनी दिली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates : महाराष्ट्रात भाजपकडून एकनाथ शिंदे यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न - महेश गायकवाड

Pooja Sawant: 'कलरफुल' पूजा सावतचं मनमोहक सौंदर्य, फोटोंनी वाढवली काळजाची धडधड

Bigg Boss 18: विवियनने रजतला खाली आपटलं; बिग बॉसच्या घरात नवीन राडा, पाहा VIDEO

Whatsapp: व्हॉट्सअ‍ॅपचं नवं फिचर; व्हिडीओ कॉल करणं आता झालं अधिक सोपं

Prajakta Mali Farmhouse: निसर्गाच्या सानिध्यात वसलंय प्राजक्ताचं सुंदर 'प्राजक्तकुंज'; फार्महाउसचं एका दिवसाचं भाडं किती?

SCROLL FOR NEXT