Shrinivas Vanga Saam Tv
Maharashtra Assembly Elections

Shrinivas Vanga : शिंदेंनी तिकीट नाकारले, श्रीनिवास वनगा अचानक घरातून निघून गेले, फोन बंद, १२ तासांपासून नॉटरिचेबल!

Shrinivas Vanga News : मागील १२ तासांपासून श्रीनिवास वनगा बेपत्ता आहेत. पोलिसांकडून त्यांचा शोध घेतला जातोय.

Namdeo Kumbhar

Shrinivas Vanga : एकनाथ शिंदे यांनी तिकीट नाकारल्यामुळे श्रीनिवास वनगा नाराज झाले. ऑन कॅमेरा त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. उद्धव ठाकरे यांच्यासारख्या देवमाणसाची साथ सोडत यांना साथ दिली, असे म्हणत वानगा यांनी आपला रोष व्यक्त केला होता. सोमवारी संध्याकाळपासून श्रीनिवास वानगा बेपत्ता आहेत. घरात कुणालाही काहीही न सांगता ते निघून गेलेत. त्यांचे दोन्ही फोनही बंद आहेत. त्यामुळे कुटुंबिय चिंतेत आहेत. जिवाचे बरे वाईट करतील, अशी भीती कुटुंबियांना आहे. सोमवारपासून पोलिस श्रीनिवास वनगा यांचा शोध घेत आहेत.

विधानसभेचं तिकीट नाकारल्याने नाराज झालेले श्रीनिवास वनगा मागील बारा तासांपासून नॉटरीचेबल आहेत. सोमवारी संध्याकाळी सात वाजताच्या सुमारास श्रीनिवास वनगा आपले दोन्ही मोबाईल बंद करून घरातून निघून गेले. मात्र यानंतर बारा तास उलटले तरीही श्रीनिवास वनगा यांचा कोणताही संपर्क होत नाहीये. त्यामुळे श्रीनिवास वनगा यांचे कुटुंबीय कालपासून चिंतेत आहे. सध्या वनगा यांच्या घराबाहेर मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त देखील तैणात करण्यात आला आहे.

घरातून बाहेर पडताना श्रीनिवास वनगा एका पिशवीत काही कपडे घेऊन घराबाहेर पडल्याचं त्यांच्या पत्नीकडून सांगण्यात आलं आहे. वनगा नेमके गेले कुठे? याचा शोध सध्या कुटुंबीयांचं पोलिसांकडून घेतला जातोय. कुटुंबीय मोठ्या चिंतेत आहेत.

पालघरचे श्रीनिवास वनगा यांची उमेदवारी डावलण्यात आली. त्यामुळे सध्या वनगा कुटुंबीय मोठ्या चिंतेत आहेत. पालघरचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार श्रीनिवास वनगा यांच्या जागी भाजपमधून आयात करून राजेंद्र गावित यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे श्रीनिवास वनगा मागील दोन दिवसांपासून डिप्रेशनमध्ये आहेत. त्यांनी अन्नपाणी सोडून दिल्याचं समोर आलेय. पालघर नाही तर डहाणू विधानसभेचे तरी तिकीट मिळेल ह्या आशेवर राहिलेल्या वनगा यांना मात्र शिंदे यांनी पूर्णतः वाऱ्यावर सोडल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला. दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या बंडात साथ देणाऱ्या ४० आमदारांमध्ये श्रीनिवास वनगा यांचाही समावेश होता. ३९ आमदारांना तिकीट देण्यात आले, पण वनगा यांचं तिकीट कापण्यात आलेय.

घरातून निघण्याआधी काय म्हणाले?

मला आमदार करणारे उद्धव ठाकरे होते. त्यांच्या कृपेमुळेच मी आमदार झालो. त्या देव माणसाची मला माफी मागायची आहे. मी त्यांच्याकडून कुठल्याही पदाची अपेक्षा करत नाही. पण मी माझ्या केलेली चुकीची माफी देव माणसाकडे (उध्दव ठाकरे) जाऊन मागणार आहे, असे साम टीव्हीसोबत बोलताना वनगा म्हणाले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sushil Kedia: एक दणका आणि केडीयाचा माफीनामा; अखरे मराठीद्रष्ट्या सुशील केडियाची अखेर माफी

Ryanair Fire : विमानाला लागली अचानक आग; जीव वाचवण्यासाठी प्रवाशांच्या उड्या, व्हिडिओ आला समोर

Stomach Ache: पोटदुखी, गॅस, अ‍ॅसिडिटीने त्रस्त आहात? मग करा 'हे' सोपे उपाय

Maharashtra Live News Update: काटई - बदलापूर रोडवर कारला लागली आग

मोठी बातमी! विजयाच्या मेळाव्यानंतर राजकीय घडामोडींना वेग; ठाकरे गटाकडून भाजपच्या मोठ्या नेत्याला ऑफर?

SCROLL FOR NEXT