Sharad Pawar Saam TV
Maharashtra Assembly Elections

Maharashtra Politics : शरद पवारांनी डाव टाकला, युगेंद्र पवार बारामतीमधून, एकाच दिवसात ५० जणांना AB फॉर्म

Maharashtra Assembly Election 2024: शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून एकाच दिवसात ५० जणांना एबी फॉर्मचे वाटप करण्यात आलेय.

Rupali Badhave

Sharad Pawar’s NCP allots forms before declaring official list : महायुतीमध्ये जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. पण शरद पवार यांनी आपला डाव टाकण्यास सुरुवात केली आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून आतापर्यंत ५० जणांना एबी फॉर्मचे वाटप करण्यात आले आहे. यामध्ये युगेंद्र पवार यांचेही नाव असल्याचे समोर आले आहे. बारामतीमधून युगेंद्र पवार विरुद्ध अजित पवार असा आमनासामना होणार, हे आता निश्चित झालेय. (Maharashtra Vidhan Sabha Election 2024:)

युगेंद्र पवार तयारीला लागले -

लोकसभेला सुप्रिया सुळे यांचा प्रचार करणाऱ्या युगेंद्र पवार यांना शरद पवार यांनी बारामतीमधून उमेदवारी दिल्याचे समोर आलेय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, युगेंद्र पवार यांना एबी फॉर्म देण्यात आलाय. त्यानंतर युगेंद्र पवार तयारीला लागले आहेत. युगेंद्र पवार यांनी निवडणूक लढविण्याच्या दृष्टीने कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यास सुरुवात केली आहे. त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातून मालमत्तेवर थकबाकी नसल्याबाबतचे ‘ना हरकत प्रमाणपत्र’ घेतले आहे. त्यामुळे बारामतीत अजित पवार यांच्या विरोधात पुतण्या उभा राहणार हे निश्चीत आहे.

५० जणांना एका दिवसात एबी फॉर्मचे वाटप -

राष्ट्रवादी कॅाग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून एकाच दिवसात सुमारे 50 AB फॅार्मचे वाटप झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सध्या पक्षासोबत असलेल्या सर्व आमदारांनी देखील AB फॅार्म दिल्याची माहिती समोर आली आहे. या सर्व ५० जणांचा पहिल्या यादीत समावेश आहे.

मराठवाडा आणि विदर्भ अशा दूरच्या उमेदवारांना पक्षाकडून AB फॅार्मच वाटप झाले आहे. बारामतीचे युगेंद्र पवार आणि मुंबईतील घाटकोपर पूर्व विधानसभेच्या उमेदवार राखी जाधव यांनाही AB फॅार्म देण्यात आलाय. पक्षाच्या वरिष्ठांकडून उमेदवारांना AB फॅार्म दिल्यानंतर कामाला लागण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

कुणाला देण्यात आले एबी फॉर्म -

जयंत पाटील

सुनील भुसारा

प्राजक्त तनपुरे

रोहित पवार

युगेंद्र पवार

राखी जाधव

अनिल देशमुख

जितेंद्र आव्हाड

राणी लंके

प्रशांत यादव

राहुल जगताप - श्रीगोंदा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नाचणाऱ्या कलेक्टरविरोधात वातावरण तापलं, शेतकरी-पोलीस आमने-सामने, VIDEO

Maharashtra Live News Update: - सोलापूर जिल्ह्यात माढा येथे सर्वाधिक पुरस्थिती

Asia Cup 2025 फायनलपूर्वी पाकिस्तानचा मोठा निर्णय, संपूर्ण स्पर्धेवर टाकला बहिष्कार

Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, बड्या नेत्यांसह ८०० कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

Pune Crime News : दिवसा खासगी बँकेत नोकरी, रात्री करायचा भयंकर खेळ; पुण्यातील तरुणासह ३९ जण अडकले

SCROLL FOR NEXT