Sharad Pawar on Maratha Reservation Saam tv
Maharashtra Assembly Elections

मनोज जरांगेंची मागणी योग्यच, मराठा आरक्षणाला आमचा जाहीर पाठिंबा; शरद पवारांनी मांडली भूमिका

Sharad Pawar on Maratha Reservation : शरद पवार यांनी रत्नागिरीमध्ये मराठा आरक्षणाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. त्याशिवाय मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या योग्यच असल्याचे त्यांनी सांगितले.

अमोल कलये

SP NCP Leader Sharad Pawar Stance on Maratha Aarakshan : मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या उपोषणाला शरद पवार यांनी पाठिंबा दिला आहे. रत्नागिरीमध्ये शरद पवार एका कार्यक्रमाला आले होते. त्यावेळी बोलताना शरद पवार यांनी मनोज जरांगे पाटील यांची मागणी योग्यच आहे. एकप्रकारे शरद पवार यांनी मराठा आरक्षणाला जाहीर पाठिंबा असल्याचे सांगितले.

शरद पवार यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या आमरन उपोषणाला पाठिंबा दिला. जरांगे यांची मागणी योग्य असल्याने आरक्षणाला पाठिंबा आहे. त्याशिवाय इतर समाजाचाही विचार व्हावे, असे वक्तव्य शरद पवार यांनी केले.

शरद पवार काय म्हणाले ?

एक देश एक निवडणूकबाबत कायदेशीर लढाई आणि मार्ग काढणे गरजेचं आहे.

घरात तरी काका आणि पुतणे एकत्र आहेत.

पहिल्यांदा आम्ही तिघांनाचा निर्णय घेऊ आणि त्यानंतर मग छोट्या पक्षांना बरोबर घेऊन त्यांना किती जागा द्यायचा याबत निर्णय घेऊ.

मुंबई गोवा महामार्गसारखा इतका वाईट रस्ता महाराष्ट्रात आहे.

महामार्गाच्या कामात किती बेफिक्रेने पाहिलं जातंय हे दुर्दैव आहे.

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा आजचा सातवा दिवस

मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावं या मागणीसाठी जालन्यातील अंतरवाली सराटीत मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण सुरू आहे, त्यांच्या आमरण उपोषणाचा आजचा सातवा दिवस आहे. आज संभाजीराजे छत्रपती हे मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला येणार आहेत, दहा ते अकरा वाजेच्या दरम्यान छत्रपती संभाजी राजे आंतरवालीत पोहोचतील आणि त्यानंतर जरांगे पाटील यांच्याशी चर्चा देखील करणार आहेत. दरम्यान आज कॅबिनेटची बैठक असून, या कॅबिनेटमध्ये मराठा आरक्षणावर काही तोडगा निघतो का हे पाहणं महत्त्वाच असणार आहे.

अहमदनगर बंद -

मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ अहमदनगर येथील मराठा आंदोलकांनी आज जिल्हा बंदची हाक दिली आहे. अहमदनगर जिल्हा बंदच्या पार्श्वभूमीवर सकाळच्या टप्प्यात व्यापाऱ्यांनी दुकान बंद ठेवली आहेत.मनोज जरांगे यांना समर्थन देण्यासाठी नगर शहरातील तहसील कार्यालयासमोर सकल मराठा समाजाच्या वतीने मागील तीन दिवसांपासून उपोषण आंदोलन देखील सुरू केलं आहे.आंदोलकांनी मराठा आरक्षणाच्या बाबतीत सगे सोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी करावी, मराठा बांधवांवर झालेले गुन्हे त्वरित मागे घ्यावे, हैदराबाद गॅझेट , सातारा गॅझेट आणि बॉम्बे गव्हर्मेंट गॅजेट लागू करावं अशी मागणी आंदोलकांने केली जात आहेत.

लातूर बंद

मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आणि मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी लातूरमध्ये मराठा समाज रस्त्यावर उतरला आहे. मराठा आंदोलकांकडून बाजारपेठ बंदच आव्हान करण्यात येत आहे. तर या आव्हानाला व्यापाऱ्यांनी देखील उत्स्फूर्त प्रतिसात दिला आहे.सकाळपासूनच बाजारपेठा कडकडीत बंद ठेवण्यात आल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Salman Khan : सलमान खाननं 'बिग बॉस 19'साठी किती घेतलं मानधन? आकडा वाचून पायाखालची जमीन सरकेल

Manikrao Kokate: कृषीमंत्री कोकाटेंवर कारवाईची टांगती तलवार? राजीनाम्याचं काऊंटडाऊन सुरू? CM दिल्ली दौऱ्यावर, नेमकं काय घडलं?

Diabetes without blood test: शरीरात हे ६ बदल दिसले तर समजा मधुमेह झालाय; ब्लड टेस्ट न करताही डायबेटीजचा धोका येईल लक्षात

Maharashtra Live News Update: यवतमाळमध्ये आमदार सोनवणे विरोधात आदिवासी संघटना आक्रमक

Accident: धुळे- सोलापूर महामार्गावर भीषण अपघात, कार २०० मीटर लांब चेंडूसारखी उडाली; अपघाताचा थरारक VIDEO

SCROLL FOR NEXT