Sanjay Raut  Saam tv
Maharashtra Assembly Elections

Maharashtra Election: एकनाथ शिंदे बालबुद्धी, निवडणुकीनंतर ते मुख्यमंत्री नसतील - संजय राऊत

Maharashtra Politics: निवडणुकीनंतर शिंदे राज्याचे मुख्यमंत्री नसतील. त्यांचा मोठेपण हे निवडणुकीचा निकाल लागेल त्या दिवशी संपणार आहे, असे संजय राऊत म्हणाले.

Namdeo Kumbhar

Sanjay Raut Assembly Election 2024: भाजपसोबत आमचा अनुभव २५ वर्षे आहे. एकनाथ शिंदे आज त्यांच्यावर नाराज असतील. उद्या कोमात जातील, मग काही वर्षांनी राजकीयदृष्टया नष्ट होतील, असा टोला संजय राऊत यांनी लगावला. वरळीमध्ये मनसेने संदीप देशपांडे यांना उमेदवारी दिली, त्यावरूनही संजय राऊत यांनी हल्लाबोल केला. ते म्हणाले की, वरळीतून कुणीही येऊ द्या, येणार तर आदित्य ठाकरेच. पाच वर्षात वरळीतील लोकांनी आदित्य ठाकरेंचं काम पाहिलेय.

शिंदे यांच्या घरात कोण मोठा माणूस आहे? ते स्वतः बालबुद्धीचे आहेत. या निवडणुकीनंतर ते राज्याचे मुख्यमंत्री नसतील. त्यांचा मोठेपण हे निवडणुकीचा निकाल लागेल त्या दिवशी संपणार आहे, असे संजय राऊत म्हणाले.

इतर लोकांना याद्या जाहीर केला असेल त्यांना विरोधात बसायचं आहे. आम्हाला सरकारमध्ये बसायचे आहे. आज संध्याकाळपर्यंत संयुक्त पत्रकार परिषद होईल, त्यामध्ये प्रमुख नेते घोषणा करतील. शिवसेनेची यादी उद्या सामनामध्ये येईल, असेही राऊत यांनी सांगितले.

शिवसेनेत इनकमिंग, आमचेच सरकार येणार -

आज साडेबारा वाजता श्रीगोंदाच्या प्रमुख नेतृत्व राजेंद्र दादा नागवडे, अनुराधाताई नागवडे हे हजारो कार्यकर्ते आणि पदाधिकारी शिवसेनेत प्रवेश करत आहेत. कोल्हापूरचे के पी पाटील प्रवेश करत आहेत. उद्या धुळ्यातून अनिल अण्णा गोटे प्रवेश करत आहेत याचा अर्थ एकदा संपूर्ण मविआचे सरकार राज्यात येणार आहे, असे संजय राऊत म्हणाले.

संजय राऊत काय म्हणाले ?

शिवसेना महाराष्ट्राचे अस्मिता स्वाभिमान आणि मराठी माणसाचा पक्ष आहे.

आम्हाला सत्ता स्थापन करायची आहे.

ज संध्याकाळी याद्या जाहीर होऊ द्या, 23 तारखेला निकाल लागतील. त्यावेळी साडेदहा वाजता मी तुम्हाला मुहूर्तावर सांगेल की नेतृत्व कोण करणार आहेत.

यादी जरी जाहीर झाल्या नसल्या तरी ए बी फॉर्म दिले आहेत. तीनही पक्षाचेा फॉर्म्यूलाही तयार झालाय.

ज्यांना उमेदवारा देऊन जे निवडून आले ते सोडून गेले. या इच्छुकांची सख्या सर्वात जास्त आमच्याकडे आहे म्हणजे आम्ही सत्तेवर आहोत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IT Notice: विधानसभेच्या रणधुमाळीत ठाकरेंना धक्का! आमदार शंकरराव गडाख यांच्या कारखान्याला नोटील, १३७ कोटी भरण्याचे आदेश

Punjab Tourist Places: थंड हवा अन् हिरवागार निसर्ग; हिवाळ्यात पंजाबमधील 'या' ठिकाणी नक्की भेट द्या

Maharashtra Weather: दिवाळीत हुडहुडी भरणार, राज्यात 'या' तारखेला थंडीची लाट पसरणार

Rishabh Pant: रिषभ पंतचा दिल्लीला रामराम? या 2 संघांकडून कॅप्टन्सीची ऑफर

Viral Video: बापरे! भररस्त्यात ९ फूट लांबीचा अजगर, वाहन चालकांची तारांबळ उडाली, थरारक VIDEO

SCROLL FOR NEXT