Maharashtra Assembly Election 2024 Saam Tv
Maharashtra Assembly Elections

Maharashtra Assembly Election : भाजपला मुंबईत हादरा, तिकीट न दिल्याने मोठा नेता साथ सोडणार, तुतारी फुंकणार?

Maharashtra politics : भाजपमे ९९ जागांवर उमेदवार जाहीर करत आघाडी घेतली, पण पक्षांमधील नाराजी चव्हाट्यावर आली आहे. नवी मुंबईत भाजपला सर्वात मोठा हादरा बसणार आहे.

Namdeo Kumbhar

Maharashtra Assembly Election 2024 : भाजपने रविवारी ९९ उमेदवारांची यादी जाहीर करत विधानसभा निवडणुकीत आघाडी घेतली. पण उमेदवारी न मिळाल्यामुळे अनेक नेत्यांनी नाराजी उघडपणे बोलून दाखवली. भाजपकडून काही बंड थंड करण्यात आले. पण काही जण निवडणूक लढण्यावर ठाम आहेत, त्यामुळे भाजपची डोकेदुखी वाढली आहे. (Maharashtra Vidhan Sabha Election)

भाजपला नवी मुंबईत मोठं खिंडार पडण्याची शक्यता आहे. संदीप नाईक (Sandeep Naik) हे निवडणूक लढण्यावर ठाम आहेत, गेल्या काही दिवसांपासून त्यांनी तयारीही केली होती. आज ते वाशीमध्ये कार्यकर्त्यांचा मेळावा घेत आपला निर्णय जाहीर करणार आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, संदीप नाईक तुतारी फुंकण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. संदीप नाईक यांनी शरद पवारांच्या पक्षात प्रवेश केल्यास हा भाजपला सर्वात मोठा धक्का मानला जात आहे.

रविवारी भाजपने गणेश नाईक यांना ऐरोली मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली. मात्र त्यांचे पुत्र संदीप नाईक यांना बेलापूरमधून भाजपाने उमेदवारी नाकारली. सध्या बेलापूरमधून विद्यमान मंदा म्हात्रे यांना भाजपाने उमेदवारी जाहीर केली. तयारी केल्यानंतरही उमेदवारी न मिळाल्यामुळे संदीप नाईक नाराज आहेत. आता संदीप नाईक राष्ट्रवादीमध्ये प्रवेश कऱणार असल्याचे समोर आले आहे. आज ते वाशीमध्ये मेळावा घेत पक्ष प्रवेश करणार असल्याचे समजतेय. विधानसभेच्या तोंडावर भाजपला बसलेला सर्वात मोठा धक्का मानला जात आहे.

भाजपने तिकीट नाकाराल्यानंतर भाजपा जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांनी कार्यकर्त्यांसोबत बैठक घेतली. तिकीट वाटपाचा निर्णय होताच सर्व कार्यकर्त्यांची एनएमएसएला बैठक पार पडली. बेलापूरमधून संदीप नाईक यांना डावलल्याने सर्व नाईक समर्थक नाराज झाले आहेत. नवी मुंबईत नाईकांचा मोठा दबदबा आहे, त्यांना माणणारा वर्गही मोठा आहे. 22 तारखेला विष्णुदास भावे येथे मेळावा घेऊन संदीप नाईक अंतिम निर्णय जाहीर करणार आहेत. सोमवारी झालेल्या बैठकीत कार्यकर्ते तुतारीसाठी आग्रही असल्याची माहिती मिळाली आहे. त्याशिवाय शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील एका वरिष्ठ नेत्यांनी आज संदीप नाईक तुतारी फुंकणार असल्याचे सांगितेलेय

गणेश नाईकांकडून संकेत -

गणेश नाईक यांनी ऐरोलीमधून सोमवारी प्रचाराला सुरुवात केली. यावेळी त्यांनी संदीप नाईक बंडखोरी करू शकतात, असे संकेत दिले. संदीप नाईक तुतारी घेणार का? या प्रश्नाचे उत्तर देताना गणेश नाईक म्हणाले की, त्यांनी पक्षाचा आदेश मानावा. पण त्यांना वाटत असेल की त्यांच्यावर अन्याय झाला आहे. तर त्यांना निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य आहे. ते जो निर्णय घेतील तो त्यांचा निर्णय असेल. नेतृत्वाने घेतलेल्या निर्णयावर मी बोलू इच्छित नाही. भाजपमध्ये नाराजी किंवा वक्तव्याला किंमत नाही. लोकशाहीमध्ये कोणाचा आवाज दाबू शकत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: रश्मी शुक्ला यांची पुन्हा राज्याच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती

Maharashtra Politics: मनसेला EVM वर भरोसा नाय का? अपयशाची सल, EVMमधून खल?

Arjun Tendulkar: सचिनचा लेक रिकाम्या हाती परतला! अर्जुन तेंडुलकर अन्सोल्ड

Maharashtra Politics : अमित शहा उद्याच मुंबईत येणार, मुख्यमंत्रिपदाची घोषणा करणार? पडद्यामागे काय घडतंय? वाचा

Sharad Pawar Speech : यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री झाले, मातोश्रींना माहीतच नव्हतं; शरद पवारांनी सांगितला तो किस्सा

SCROLL FOR NEXT