Nana Patole  saam tv
Maharashtra Assembly Elections

Assembly Election: साकोलीचं महाभारत ! जातीय समीकरण कुणाच्या पथ्यावर? पटोलेंपुढे अविनाश ब्राह्मणकरांचं आव्हान

Sakoli Mahabharata : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंना त्यांच्याच साकोली मतदारसंघात भाजप आणि बंडखोरांचं दुहेरी आव्हान आहे. त्यामुळे साकोलीत मोठं महाभारत रंगलंय.. त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

भरत मोहोळकर, साम प्रतिनिधी

राज्यातील हाय होल्टेज लढतींपैकी एक असलेल्या साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले मैदानात उतरले आहेत. तर भाजपने अविनाश ब्राह्मणकरांना रिंगणात उतरवलंय.. मात्र अजित पवारांच्या राष्ट्रवादीतून आयात केलेल्या ब्राह्मणकरांना संधी दिल्याने भाजपच्या सोमदत्त करंजकरांनी अपक्ष दंड थोपटले आहेत. त्यामुळे तिरंगी लढत रंगणार आहे. मात्र ब्राह्मणकर आणि पटोलेंनी विजयाचा विश्वास व्यक्त केलाय.

साकोली मतदारसंघाने सलग एकाच पक्षाला कधीच कौल दिला नाही. साकोलीत कधी काँग्रेस तर कधी भाजपचा उमेदवार विजयी झालाय. मात्र 2009 मध्ये नाना पटोलेंनी भाजपच्या तिकीटावर पटोलेंनी विजय मिळवला. तर 2014 मध्ये भंडारा लोकसभेत पटोलेंनी प्रफुल्ल पटेलांचा पराभव केला. मात्र 2018 मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

2019 च्या विधानसभा निवडणुकीत भुमिपूत्र विरुद्ध बाहेरचा असा प्रचार करत पटोलेंनी भाजपच्या परिणय फुकेंचा पराभव केला. साकोलीतलं 2019 मधील मतांचं गणित नेमकं कसं आहे? पाहूयात.

2019 मधील मतांचं गणित

नाना पटोले, उमेदवार, काँगेस, - 95208

डॉ.परिणय फुके, उमेदवार, भाजप - 88968

6 हजार 240 मतांनी पटोलेंचा विजय

साकोलीत कुणबी, तेली आणि दलित मतांचा मोठा प्रभाव आहे. त्यातच नाना पटोले हे कुणबी आणि दलित मतांचं गणित साधत विजयी झाले होते. मात्र आता प्रफुल्ल पटेलांचे निकटवर्तीय अविनाश ब्राह्मणकर कुणबी समाजाचे नेते आहेत.

मात्र उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेले सोमदत्त करंजकर यांनी बंडाचा झेंडा फडकवलाय. करंजकर हे तेली समाजाचे नेते आहेत. त्यामुळे कुणबी समाजातल्या मतांमध्ये प़डणा-या फुटीचा कुणाला फटका बसणार आणि तेली समाजाचे करंजकर कुणाच्या मतांवर कब्जा करणार यावर पटोलेंच्या विजयाचं गणित अवलंबून असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Soybean Side Effects : सोयाबीन कोणत्या व्यक्तींनी खाणं टाळावं?

Maharashtra Live News Update: सुषमा अंधारे अन् कुणाल कामराच्या अडचणीत वाढ; विधिमंडळात हक्कभंग प्रस्ताव मंजूर

Accident News : एकीकडे मुसळधार पाऊस, टेम्पोची दुचाकीला धडक, बायकोसमोर नवऱ्याचा अंत; भरपावसात पत्नीचा आक्रोश

Hindi Langauge Row: हिंदी सक्तीच्या जीआरची होळी प्रकरणी २५० ते ३०० जणांवर गुन्हा; आंदोलनात उद्धव ठाकरे यांचीही उपस्थिती | VIDEO

Relationship Tips : महिलांच्या मनातलं कसं ओळखायचं?

SCROLL FOR NEXT