Akola west saam tv
Maharashtra Assembly Elections

Saam Exit Poll: अकोला पश्चिममधून साजिद खान होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Akola Vidhansabha Election Exit Poll Result: विधानसभा निवडणूकीत काँग्रेसचं पारड अधिक जड दिसून येतंय. अकोल्यामध्ये काँग्रेसकडून साजिद खान यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

Surabhi Jayashree Jagdish

बुधवारी संपूर्ण महाराष्ट्रात मतदान पार पडलं. विधानसभेच्या या निवडणूकीचा निकाल २३ तारखेला लागणार आहे. या निकालाच्या आधारावर पुढची ५ वर्ष आता कोणात्या पक्षाची सत्ता येणार? कोण निवडून येणार आणि कोणाचा उमेदवार पडणार? हे ठरणार आहे. अशातच सकाळचा एक्झिट पोल हाती आला असून कोणत्या ठिकाणी कोणता संभाव्य आमदार असणार ते याची माहिती घेऊया.

विधानसभा निवडणूकीत काँग्रेसचं पारड अधिक जड दिसून येतंय. अकोल्यामध्ये काँग्रेसकडून साजिद खान यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर साजिद यांच्या विरूद्ध विजय अग्रवाल यांना भाजपकडून तिकीट मिळालं आहे. मात्र सकाळच्या एक्झिट पोलमधून आलेल्या आकडेवारीनुसार, भाजपाचा या ठिकाणी होण्याची शक्यता आहे.

अकोल्यामध्ये ५७ टक्के मतदानाची नोंद करण्यात आली आहे. गेल्या विधानसभा मतदानाच्या तुलनेत यावेळी सहा टक्के अधिक मतदान झालेलं पाहायला मिळालं. दरम्यान या वाढलेल्या मतदानाचा कोणाला फायदा होतो हे पाहावं लागणार आहे. या मतदार संघामध्ये बिगर अल्पसंख्याक मतदारांच्या मतांचं मोठ्या प्रमाणात विभाजन होऊ शकतं. मात्र असं असून साजिद खान हे संभाव्य आमदार असू शकतात.

टिप: सकाळ समूहाच्या सर्व्हेतून एक्झिट पोलचे अंदाज वर्तवण्यात आलेले आहेत. ही फक्त प्राथमिक आकडेवारी आहे. २३ तारखेला राज्यात कुणाचं सरकार स्थापन होणार, याचं चित्र स्पष्ट होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Talking in Sleep: झोपेत तुम्हीही बडबड करता? दुर्लक्ष करू नका, असू शकते गंभीर आजाराचे लक्षण

Coconut Water Vs Lemon Water: नारळपाणी की लिंबूपाणी, उपवासाला कोणते ड्रिंक प्यावे?

Maharashtra News Live Update: काँग्रेस देशात अराजकता पसरवण्याचं काम करत आहे - फडणवीस

Congress Protest Live Update : इंडिया आघाडीच्या थेट सुप्रीम कोर्टावर मोर्चा

Joint pain causes: सांधे दुखत असतील तर सावध व्हा! वाढतं वयच नाही, तर ही कारणंही ठरू शकतात सांधेदुखीला जबाबदार

SCROLL FOR NEXT