pandharpur saam tv
Maharashtra Assembly Elections

Maharashtra Exit Poll: पंढरपूरमधून समाधान आवताडे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Pandharpur assembly constituency, Exit Poll Maharashtra Result : यंदाच्या निकालामध्ये पंढरपूर भागाच्या निकालाकडे अनेकांचं लक्ष आहे. यावेळी पंढरपूर मतदारसंघात भाजप उमेदवाराचं पारडं जड दिसतंय.

Surabhi Jayashree Jagdish

बुधवारी महाराष्ट्राची विधानसभेची निवडणूक पार पडली असून २३ तारखेला मतमोजणी करण्यात येणार आहे. यावेळी यंदाची ५ वर्षे आता कोणात्या पक्षाची सत्ता येणार? कोणता उमेदवार निवडून येणार, कोण पडणार? असे बरेच प्रश्न लोकांच्या मनात येतायत. यावेळी सकाळचा एक्झिट पोल हाती आला असून कोणत्या ठिकाणी कोणता संभाव्य आमदार असणार ते याची माहिती घेऊया.

यंदाच्या निकालामध्ये पंढरपूर भागाच्या निकालाकडे अनेकांचं लक्ष आहे. यावेळी पंढरपूर मतदारसंघात भाजप उमेदवाराचं पारडं जड दिसतंय. इथले संभाव्य आमदार कोण आहेत ते पाहूयात.

भाजपचे समाधान आवताडे यांना भाजपकडून विधानसभेचं तिकीट देण्यात आलं आहे. त्यामुळे समाधान यंदाच्या वेळी संभाव्य आमदार असण्याची शक्यता आहे. यावेळी भाजपाला मनसेचं आव्हान आहे. मनसेकडून दिलीप धोत्रे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे.

दरम्यान मनेसेचे दिलीप धोत्रे यांच्यामुळे राजकीय वातावरण गाजलं होतं. पंढरपूर मतदार संघात चौरंगी लढत पाहायला मिळाली. या ठिकाणी महाविकास आगाडीचे दोन उमेदवार आमनेसामने आले आहेत. त्यामुळे मतविभागणीचा फायदा भाजपाला मिळू शकतो. त्यामुळे भाजपचे आमदार समाधान आवताडे यांना पु्न्हा एकदा संधी मिळण्याची शक्यता आहे.

टीप: सकाळ समूहाच्या सर्व्हेतून एक्झिट पोलचे अंदाज वर्तवण्यात आलेले आहेत. ही फक्त प्राथमिक आकडेवारी आहे. २३ तारखेला राज्यात कुणाचं सरकार स्थापन होणार, याचं चित्र स्पष्ट होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gautam Gambhir: 1 रूपयात पोटभर जेवण! टीम इंडियाच्या गुरूचं कौतुक करावं तितकं कमी, Video

Marathwada : १५०० कोटींपेक्षा अधिक निधी, पण शेतकऱ्यांना KYC नंतरच मदत, पुरानंतर पुराव्याचं संकट? | VIDEO

Marathi Actor : मराठी अभिनेत्यानं परदेशी गर्लफ्रेंडसह गुपचुप केलं लग्न, पोस्ट शेअर करत दिली आनंदाची बातमी

Maharashtra Live News Update: पंढरपुरात चंद्रभागाने इशारा पातळी गाठली; नदीकाठी पूरस्थिती

Kolhapur Tourism : कोल्हापूरमधील बेस्ट पिकनिक स्पॉट, येथे संध्याकाळी होते पर्यटकांची गर्दी

SCROLL FOR NEXT