Aaramori Assembly Election SaamTv
Maharashtra Assembly Elections

Exit Poll Maharashtra : आरमोरीत कृष्णा गजबे होणार आमदार? पाहा Exit Poll

SAAM Exit Poll, Maharashtra Assembly Election 2024 : राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता कोणाची सत्ता येणार, आपल्या विधानसभा मतदारसंघात आमदार कोण असणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. सकाळने केलेल्या एक्झिट पोलमधून संभाव्य आमदारांची नावं समोर येत आहे.

Saam Tv

गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी विधानसभा मतदारसंघात महायुतीतील भारतीय जनता पार्टी कृष्णा दामाजी गजबे यांनी निवडणूक लढवली आहे. त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीतील काँग्रेसचे रामदास मालुजी मसराम हे निवडणुकीच्या रिंगणात होते.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाचे उमेदवार कृष्णा गजबे यांनी विजय मिळवला होता. त्यानंतर यावेळी त्यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली. याठिकाणी भाजपच पारड जड असलं तरी संभाव्य आमदार कोण असणार याबद्दल व्हरचा रंगल्या आहेत. सकाळच्या एक्झिट पोलनुसार आरमोरी मतदारसंघात कृष्णा गजबे यांना यांना मतदारांचा कौल मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदाच्या विधानसभा निवडणूक निकालानंतर संभाव्य आमदार म्हणून कृष्णा गजबे यांचं नाव समोर येत आहे.

एकंदरीतच एक्झिट पोलची आकडेवारी संभाव्य असली तरी आरमोरी विधानसभेत मतदार कुठेतरी भाजपला आपला कौल देताना दिसत आहेत. या ठिकाणी 71 टक्के इतकं मतदान काल झालं आहे. भाजप विरुद्ध कॉंग्रेस अशी सरळ लढत या ठिकाणी झाली आहे. मात्र कॉंग्रेसचे 10 वर्ष आमदार राहिलेले आनंदरावजी केडाम यांनी अपक्ष अर्ज दाखल केल्याने याठिकाणी कॉंग्रेसच्या मतांची विभागणी झाली आहे. त्याचाच फायदा भाजपला आणि कृष्णा गजबे यांना होणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा संभाव्य आमदार म्हणून गजबे यांचंच नाव पुढे येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यात कंटेनरला भीषण आग

Hans Mahapurush Rajyog: 12 वर्षांनंतर गुरु वक्री होऊन बनवणार हंस महापुरुष राजयोग, 'या' राशींच्या घरी होणार पैशांचा पाऊस

Success Story: ब्युटी विथ ब्रेन! नोकरी करत केली UPSC क्रॅक; IAS नेहा यादव यांचा प्रेरणादायी प्रवास

Gaza News Today : गाझात उपासमारीने 124 जणांचा मृत्यू; 50 ग्रॅमचं बिस्किट 750 रुपयांना, VIDEO

Monday Horoscope : गणरायाची कृपा होणार,अचानक मोठा पैसा मिळवाल; ५ राशींचे लोक ठरणार भाग्यवान, वाचा राशीभविष्य

SCROLL FOR NEXT