Maharashtra Politics  Saam Tv
Maharashtra Assembly Elections

Maharashtra Politics : बडनेऱ्यात पाना की मशाल ? रवी राणा विरुद्ध प्रीती बंड आमनासामना!

Maharashtra Vidhan Sabha Election 2024: राणांना भाजपची साथ कि विरोधात? बडनेऱ्याचं राजकारण तापलेय.

Namdeo Kumbhar

Maharashtra Assembly Election 2024: राज्यातला सध्या सर्वाधिक चर्चेत असलेला मतदारसंघ म्हणजे अमरावतीलला बडनेरा विधानसभा मतदारसंघ. या मतदारसंघातून सलग तीन वेळा विजय मिळवणारे अपक्ष आमदार रवी राणा यांना यंदाची निवडणूक सोपी नाही. कारण त्यांनी पाठिंबा दिलेल्या महायुतीतलेच भाजपचे स्थानिक नेत्यांनी त्यांच्याविरोधात शड्डू ठोकले आहेत. काय आहे बडनेऱ्याचं महाभारत

राणांना भाजपची साथ की विरोधात?

राज्यातला सर्वाधिक लक्षवेधी मतदारसंघांपैकी एक असलेला विदर्भातला बडनेरा विधानसभा मतदारसंघ....या मतदारसंघात गेल्या १५ वर्षांपासून अपक्ष निवडणूक लढत असलेले युवा स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष रवी राणांचा विजयी रथ कुणीही रोखू शकलेले नाही. राणा हे सत्तेत असलेल्यांशी जुळवून घेण्यात माहिर समजले जातात. आधी पवारांच्या राष्ट्रवादीशी सूत जुळवून राणांनी आपली आमदारकी शाबूत राखली.

एवढंच नव्हे तर २०१९ला राष्ट्रवादीमुळेच त्यांच्या पत्नी नवनीत राणांच्या खासदारकीचा मार्ग प्रशस्त झाला होता. त्यानंतर राज्याची राजकीय समीकरणं बदलली आणि राणांनीही सत्ताधारी भाजपाशी सलगी केली. मात्र ही सलगी अमरावती जिल्ह्यातल्या स्थानिक भाजप नेत्यांना रुचलेली नाही. त्यामुळे राणांना विरोधकांपेक्षा सर्वात मोठं आव्हान आहे ते मित्रपक्ष भाजपच्या स्थानिक नेत्यांच्या नाराजीचं. याचाच फायदा उचलण्यासाठी ठाकरे गटाच्या इच्छुक प्रीती बंड सरसावल्या आहेत.

भाजपात राहून घात करणारे कटप्पा

भाजपच्या कमळाला पाडण्याचं काम ज्यांनी केलं ते काही लोकांच्या सुपाऱ्या घेऊन भाजपसोबत राहून भाजपचा घात करतात असे कटप्पा लोक आहे, अशा भाजपच्या कटप्पा लोकांवर भाजपची पक्षश्रेष्ठी तुषार भारतीय व आमदार श्रीकांत भारतीय यांच्यावर कारवाई करेल अशी प्रतिक्रिया रवी राणा यांनी दिली.

आमदार रवी राणा यांनी बडनेरा विधानसभा मतदारसंघांमध्ये सलग तीन वेळा प्रतिनिधित्व केलंय. गेल्यावेळी त्यांनी शिवसेनेच्या प्रीती बंड यांचाच पराभव केला होता. मात्र त्यांनी निवडून आल्यानंतर आपला पाठिंबा भाजपला दिला. नेमकं विजयाचं गणित कसं होतं ते पाहूयात...

2019 मधील मतांचं गणित?

रवी राणा, आमदार, युवा स्वाभिमान पक्ष. 90हजार 460 मतं.

प्रीती बंड, ठाकरे गट- 74 हजार 919 मतं

15541 मतांनी प्रीती बंड यांचा पराभव

गेल्या पाच वर्षांत राणा भाजपसोबत असले तरी स्थानिक पातळीवर मात्र भाजपचे विधान परिषदेचे आमदार श्रीकांत भारतीय यांचा भाऊ तुषार भारतीय यांनी जाहीरपणे राणांविरोधात शड्डू ठोकले आहेत. एवढंच नव्हे महायुतीची ही जागा भाजपला सोडण्यासाठी भारतीयांनी जोरदार प्रयत्न केले आहेत. त्यामुळे राणांसमोर भारतीयांच्या नाराजीचं आव्हान आहे.

'भाजपचा कार्यकर्ता राणांचं काम करणार नाही'

रवी राणा यांनी अमरावतीच्या भाजप कार्यालयावर हल्ला केला होता, रवी राणा यांना त्यांचा पराभव दिसत आहे, भारतीय जनता पक्षाचा कोणताही कार्यकर्ता रवी राणा यांचं काम करणार नाही अशी ठाम भूमिका भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे. लोकसभा निवडणूकीत रवी राणांच्या पत्नी नवनीत राणांचा पराभव झाल्यानं रवी राणांचं टेन्शन वाढलंय...त्यात भाजपनं जाहिरपणे राणांविरोधात असहकार पुकारलाय. त्यामुळे यंदा राणांसमोर विजयाचं गणित जुळवण्याचं मोठं आव्हान आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking News : संतापजनक! राजकीय वाद टोकाला, महिला मध्यरात्री उठली अन्...

Mithila Palkar: मिथिला पालकरचं वय वाढतय अन् सौंदर्यही खुलतय...

Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील सातही आरोपींची नावं समोर; कोकेन-गांजा, १० मोबईल अन् २ कार जप्त

Maharashtra Live News Update: नांदूर-मध्यमेश्वर धरणातून पाणी विसर्ग वाढवला

Anil Gote : भ्रष्टाचाऱ्यांसाठी जेल म्हणजे भाजप कार्यालय; माजी आमदार अनिल गोटेंचा सरकारवर हल्लाबोल

SCROLL FOR NEXT