Ramdas Athawale Latest News saam tv
Maharashtra Assembly Elections

Ramdas Athawale : आरपीआयला किमान 2-3 जागा द्या, आठवलेंची महायुतीकडे मागणी

Maharashtra Assembly Election 2024 : किमान दोन जागा तरी महायुतीने आरपीआयला द्याव्यात, अशी मागणी रामदास आठवले यांनी केली आहे.

Namdeo Kumbhar

Mahayuti seat-sharing formula in maharashtra : महायुतीचे जागावाटप अंतिम टप्प्यात पोहचले आहे. काही जागांवरील तिढा आज सुटण्याची शक्यता आहे. महायुतीचा घटकपक्ष आरपीआयला अद्याप एकही जागा मिळाली नाही. रामदास आठवले यांनी महायुतीला दोन जागा देण्याची मागणी केली आहे.

आरपीआयने महायुतीकडे दोन जागांची मागणी केली आहे. या आधी आठवलेंनी आरपीआयला 8 ते 10 मागीतल्या होत्या. मात्र किमान दोन तीन जागा तरी द्याव्यात किंवा विधान परिषद मिळावी. महामंडळ मिळावे. सत्तेत सहभाग ठिक ठिकाणी देण्याचा निर्णय करावा, अशी आमची मागणी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केली आहे.

पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात विकास सुरू आहे, म्हणून आम्ही महायुती सोबत आहोत. मात्र आरपीआयच्या कार्यकर्त्यायमध्ये नाराजी आहे. त्यामुळे महायुतीने विचार करावा आणि दोन जागा द्याव्यात, अशी मागणी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. एका कार्यक्रमासाठी आठवले कल्याणात आले होते. यावेळी त्यानी पत्रकारांशी संवाद साधला.

महाराष्ट्रात आरपीआय आठवले गटाला महायुतीकडून एकही जागा न दिल्यामुळे आता आरपीआय आठवले गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या कुठल्याच उमेदवाराचं प्रचार करणार नसल्याचं आरपीआय आठवले गटाच्या कार्यकर्त्यांनी घोषित केला आहे मुलुंड मध्ये आरपीआय कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत देवेंद्र फडणवीस आणि भाजपचा निषेध केला. ईशान्य मुंबईमध्ये आम्ही महायुतीच्या कुठल्याही उमेदवाराचा प्रचार करणार नसल्याचं यावेळी या कार्यकर्त्यांकडून सांगण्यात आलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Exit Poll Maharashtra : दापोली विधानसभा मतदारसंघाचे संभाव्य आमदार कोण? पाहा Exit Poll

Maharashtra Exit Poll: रत्नागिरी मतदारसंघातून उदय सामंत होणार आमदार? पाहा Exit Poll

Maharashtra Exit Poll: गोदिंयामधून भाजपचे विनोद अग्रवाल होणार आमदार? पाहा Exit Poll

Mankhurd Exit Poll: अबू आझमी की नवाब मलिक, मानखुर्द विधानसभा मतदारसंघाचे संभाव्य आमदार कोण?

Saam Exit Poll : सांगलीत भाजप मारणार बाजी? एक्झिट पोलमध्ये कौल कुणाला?

SCROLL FOR NEXT