Rahul Gandhi Nagpur Saam
Maharashtra Assembly Elections

Rahul Gandhi : नागपुरात येऊन राहुल गांधींचं आरएसएसला आव्हान, संविधान सन्मान संमेलनात हल्लाबोल, काय म्हणाले?

Rahul Gandhi In Nagpur : आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा मोडणार असल्याचे अश्वासन यावेळी राहुल गांधी यांनी दिले.

Namdeo Kumbhar

Rahul Gandhi slam RSS In Nagpur : नागपूर येथील संविधान सन्मान संमेलनात बोलताना काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी भाजप आणि आरएसएसवर हल्लाबोल केला. संविधानवर आरएसएस थेट हल्ला करु शकत नाहीत, म्हणून लपून वेगळ्या मार्गाने हल्ला करतात, असे म्हणाले. त्याशिवाय संविधानाचे महत्त्वही यावेळी त्यांनी सांगितले. राहुल गांधी यांनी जातीनिहाय जनगणनेवरही भाष्य केले. राहुल गांधी यांनी अदानी-अंबानी यांच्यावरुन पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधा. जातीनिहाय जनगणनेचा खरा अर्थ न्याय, हक्क होय, असे राहुल गांधी म्हणाले.

आरएसएसवाले संविधानावर थेट हल्ला करु शकत नाहीत, कारण समोरासमोर जर या विरोधात लढले तर ते पाच मिनिटात पराभूत होतील. त्यामुळे कायम लपून हल्ला करण्याचे काम सुरु आहे. आरएसएसमध्ये दम असता तर ते सरळ आले असते, असा थेट हल्लाबोल नागपूरमध्ये राहुल गांधी यांनी केलेय.

राहुल गांधी काय म्हणाले ?

यापूर्वी तीन-चार संमेलन झालेली आहेत. चांगली चर्चा होते आणि त्यातून एक दिशा मिळते. प्रत्येक संमेलनात महात्मा गांधी ,शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले, तुकाराम महाराज, शाहू महाराज, बिरसा मुंडा, भगवान बुद्ध त्यांचं स्मरण आपण करतो.

जेव्हा आपण आंबेडकर आणि महात्मा गांधींचा विषयावर बोलतो, तेव्हा एका व्यक्तीबद्दल बोलत नाही.

आंबेडकर एक व्यक्ती असले तरी त्यांच्या मुखातून कोट्यावधी लोकांचा, जनतेचा आवाज निघत होता. मी आंबेडकरांना खूप वाचलेय, ते सर्व सामन्यांबद्दल बोलायचे.

आंबेडकरांच्या संविधानात फुले-बुद्धांचा आवाज आहे.

संविधान फक्त एक पुस्तक नाही, तर जगण्याचा मंत्र आहे.

संविधानात समानता, प्रत्येक जाती-धर्माचा आदर आहे.

संविधानातूनच देशातील शिक्षण, आरोग्य व्यवस्था

संविधानाचा विचार हजारो वर्षांपूर्वीचा आहे.

गांधी, आंबेडकरांच्या मुखातून स्वत:चा नाही, जनतेचा आवाज निघायचा.

आरएसएसवाले संविधानावर थेट हल्ला करु शकत नाहीत, कारण समोरासमोर जर या विरोधात लढले तर ते पाच मिनिटात पराभूत होतील. त्यामुळे कायम लपून हल्ला करण्याचे काम सुरु आहे. आरएसएसमध्ये दम असता तर ते सरळ आले असते.

निवडणूक आयोग, प्रशासन, रुग्णालय, असं सगळेच संविधानात आहे. एक व्यक्ती दगेशाचं भविष्य हिसकावेल, असं संविधानात लिहिलेलं नाही. संविधानात सर्वांच्या अधिकारांबाबत लिहिलेलं आहे.

संविधान फक्त एक पुस्तक नाही, तर जगण्याचा मंत्र आहे.

शिशुमंदिरासाठी एमपी, गुजरात, राजस्थानमधून पैसे आले. अदानी, अंबानी यांचा पैसा, विकासाचा पैसा आलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Murtijapur Exit Poll: मुर्तिजापूर मतदारसंघातून कोण निवडून येणार? हरिश पिंपळे की सम्राट डोंगरदिवे? पाहा एक्झिट पोल

Relationship Tips: तुमच्या जोडीदाराला द्या 'या' रंगाचा रत्न, प्रेमात गोडवा वाढेल

Maharashtra Exit Polls: राजुरामध्ये अपक्ष उमेदवार वामनराव चटप होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Exit Polls of Maharashtra : शेकापच्या बालेकिल्ल्यात धनुष्यबाण चालणार? पाहा एक्झिट पोल

पायात काळा धागा का बांधला जातो? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT