Maharashtra Assembly Elections

PM Modi: मविआत मुख्यमंत्रिपदावरून कुस्ती, महाविकास आघाडी तीन चाकांची गाडी; सोलापुरात मोदींची विरोधकांवर टोलेबाजी

Maharashtra Election: विधानसभा निवडणुकीचा जोर वाढलाय. प्रचाराचा धुराळा उडालाय. आज पंतप्रधान मोदींची सोलापुरात सभा चालू आहे. यात सभेत त्यांनी विरोधकांवर हल्लाबोल केलाय.

Bharat Jadhav

महाविकास आघाडीत मुख्यमंत्रिपदावरून कुस्ती चालू आहे. आघाडीतील एक पक्ष पूर्ण दिवस मुख्यमंत्रिपदावरील दावेदारी करण्यात व्यस्त असते असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ठाकरे गटाला मारला. पंतप्रधान मोदी आज सोलपुरात महायुतीच्या उमेदवारांसाठी सभा घेत आहेत.

सोलापुरातील सभेत बोलतांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांवर जोरदार टोलेबाजी केली. महाराष्ट्राला स्थिर सरकारची गरज आहे. तर विरोधी पक्ष आघाडी ही तीन चाकांची गाडी आहे. महाविकास आघाडी हे तीन चाकांची गाडी असून ते अस्थिर आहेत. त्यांच्यात मुख्यमंत्रिपदावरून चढाओढ लागलीय. निवडणुकीच्या आधीपासून त्यांच्यात कुस्ती चालू आहे. निवडणुकीनंतर मविआत काय होईल असा टोला देखील पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांना मारला.

नेहमी प्रमाणे पंतप्रधान नरेंद्री मोदींनी आपल्या भाषणाची सुरुवात मराठीतून केली. यावेळी त्यांनी पंढरीच्या विठ्ठलाला नमन केलं. सोलापूरचे लोक ज्या विकासाची मागणी करत होते, त्याची पूर्ती महायुती सरकारने पूर्ण केली आहेत.

काही दिवसांपूर्वी सोलापूर विमानतळाच्या विस्ताराचं उद्घाटन आपण केल्याचंही पंतप्रधान मोदींनी सांगितले. देशात जितके पंतप्रधान झाले असतील त्यातून मीच असेन की जो सर्वात जास्त वेळा सोलापुरात आलो असेल. सोलापूरकरांनी मला मोठं प्रेम दिलं. सोलापुराकरांच प्रेम मला ऊर्जा देत असल्याचं मोदी म्हणाले. सोलापूरच्या फोर लेन हायवे चहू बाजुला झाले आहेत, सोलापूरपासून वंदे भारत चालू झालीय.

हे बदल केंद्रातील भाजप आणि राज्यातील महायुतीच्या कामामुळे झाले आहेत. आज आपण विकसीत महाराष्ट्रापासून विकसीत भारताकडे जात आहोत. भाजप युती आहे, तर गती आहे, महाराष्ट्राची प्रगती असल्याचा नारा पंतप्रधान मोदींना दिलाय. महाराष्ट्राला पुढील पाच वर्षापर्यंत महायुतीची अशी सरकार लागेल जी स्थिर असेल. जी महाराष्ट्रासाठी दूरगामी धोरणं तयार करेल. परंतु महाविकास आघाडीची सरकार आहे ती तीन चाकांची गाडीवर आहे.

पण या गाडीला ना ब्रेक आहे टेरिग आहे. ही गाडी कोण चालवेल यासाठी त्या तिन्ही पक्षांमध्ये मारामारी चालू असल्याची टीका पंतप्रधान मोदींनी केली. आघाडीची सर्वात जास्त अस्थिर गाडी आहे, हे लोक एकमेकांमध्ये लढण्यात वेळ घालवतात असंही मोदी म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manoj Jarange: मोठी बातमी! मनोज जरांगे मुंबईकडे रवाना, आंदोलनासाठी परवानगी मिळेल का?

घरामध्ये पैसा टिकावा आणि सुख-समृद्धी नांदावी यासाठी गणेशोत्सवात करा ‘हे’ 5 सोपे वास्तु उपाय!

Maharashtra News Live Update: दिल्लीतील अनेक शाळांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी

Pune : पुण्यात वाहतुकीत मोठा बदल! 'या' महत्त्वाच्या मार्गावरील वाहतूक २ तास राहणार बंद; पर्यायी मार्ग कोणते? जाणून घ्या

Dal Benefits : हृदय अन् मेंदूसाठी वरदान! रोज मूठभर खा 'ही' डाळ, ७ फायदे वाचून व्हाल थक्क

SCROLL FOR NEXT