Assembly Election Mahavikas Aaghadi  Quint
Maharashtra Assembly Elections

Maharashtra Assembly Election : मविआचा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला? काँग्रेस ११९ जागा; ठाकरे, पवारांना किती?

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राज्यात आचारसंहिता लागू झाली आहे. २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे, तर २३ नोव्हेंबर रोजी निकाल लागणार आहे.

Namdeo Kumbhar

MVA Maharashtra Seat Sharing Formula : विधानसभा निवडणूकीची (maharashtra politics) घोषणा झाली. तर दुसरीकडे महाविकास आघाडीचा संभाव्य जागा वाटपाचा फॉर्म्युला समोर आलाय आहे. दोन तीन दिवसांमध्ये उमदेवारांची घोषणा होण्याची शक्यता आहे. जागावाटपात काँग्रेस मोठा भाऊ ठरल्याचे दिसत आहे.

विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलंय.. त्यापार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या जागा वाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात असून संभाव्य जागा वाटपाचा फॉर्म्युला समोर आलाय... तर या जागा वाटपात इंडिया आघाडीतील घटकपक्षांनाही समावून घेण्यात आलाय..मात्र हा जागा वाटपाचा फॉर्म्युला नेमका काय आहे? पाहूयात....

मविआचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला?

काँग्रेस -119 जागा, ठाकरे गट -86 जागा, शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 75, तर शेकाप - 3, समाजवादी पक्ष -3 आणि कम्युनिस्ट पक्षाला 2 जागा देण्याचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती समोर आलीय...

लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीत सर्वाधिक जागा जिंकत काँग्रेस मोठा पक्ष ठरला होता. मात्र शरद पवारांनी 80 टक्के स्ट्राईक रेटसह महाविकास आघाडीत आपला वरचष्मा कायम राखला होता.. लोकसभा निवडणूकीत नेमकं काय चित्रं होतं पाहूयात....

लोकसभा निवडणुकीतील स्थिती

काँग्रेस 13

ठाकरे गट- 9

राष्ट्रवादी (SP) - 8

महाविकास आघाडीचा संभाव्य जागा वाटपाचा फॉर्म्युला समोर आला असला तरी अजूनही 15-20 जागांवर तिढा कायम असल्याची माहिती सुत्रांनी दिलीय.. तर संभाव्य जागा वाटपानुसार काँग्रेसच मोठा भाऊ आहे. मात्र महाविकास आघाडीत मोठा भाऊ, लहान भाऊ याचा विचार न करता एकत्र लढण्याचा निर्धार विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी केलाय..

मविआचं जागा वाटपाचं गणित ठरलं?

हरियाणात फटका बसल्याने काँग्रेसनेही सावध भूमिका घेतलीय. मात्र लोकसभेला जलवा दाखवल्यानंतरही पवारांनी कमी जागा घेण्याची भूमिका घेतल्याने मविआतील पक्ष बुचकाळ्यात पडलेत...तर हा नवा फॉर्म्युला ठाकरे गट, पवारांचा पक्ष आणि मविआतील घटकपक्षांना मान्य होणार का? यावर सत्तेचं गणित अवलंबून असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : जास्त नाटकं केली तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे - राज ठाकरे

Karnataka Hill Station: ट्रेकिंग अन् नयनरम्य दृश्य! कर्नाटकातील 'या' हिल स्टेशनला नक्की भेट द्या

१२ वर्षाच्या विद्यार्थ्यांचा अचानक मृत्यू, शाळेच्या गेटजवळ कोसळला; घटना सीसीटीव्हीत कैद

Marathi Language: मायबोली मराठी भाषेचा उदय कधी झाला माहिती आहे का?

Marathi Bhasha Vijay Live Updates: केडियाचं ऑफिस उद्ध्वस्त; हा तर फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अजून बाकी आहे – मनसैनिकांचा इशारा|VIDEO

SCROLL FOR NEXT